सातारा : येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना टेस्टींग लॅब उभारण्यास शासनाने परवानगी दिली होती. यानुसार अत्याधुनिक अशी लॅबची उभारणी करण्यात आली आहे. या लॅबचे उद्धाटन आज (साेमवार) पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
उत्तर मांड धरण भरून वाहू लागले
साताऱ्यात मध्यवर्ती ठिकाणी कोरोना टेस्टींग लॅब असावी अशी सर्वांची इच्छा होती. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात लॅबच्या उभारणीचा प्रस्तावाला शासनाकडून मान्यता आणि निधीची पूर्तता झाल्यानंतर आज (साेमवार) कोरोना टेस्टींग लॅबचे उद्घाटन झाले.
कासजवळ पुन्हा रस्ता खचण्याची भीती, अपघाताची शक्यता
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (ता.9) कराडमध्ये ही लॅब तातडीने कार्यान्वित होईल असे स्पष्ट केले होते. त्यानूसार आज त्याची अंमलबजावणी देखील झाली. या लॅबममधून दररोज 380 जणांचे नमुने तपासले जाणार आहेत.
'या' पर्यटनस्थळी निसर्ग खुलला; पण पर्यटकांविना सुना-सुना
तपासणींच्या संख्येत यामध्ये आणखीन वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या लॅबमुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा अहवाल 24 तासाच्या आत मिळणार आहे. त्यामुळे रुग्णावर वेळेत उपचार करण्यास मोठी मदत होणार आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी नमूद केले.
कोरोनाच्या काळात मला खूप संघर्ष करावा लागला. आर्थिक संकटांना सामोरे जावं लागलं, परंतु मी जिद्द हरलेलो नाही वाचा शैलेंद्रची संघर्षमय कहाणी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.