khandala  sakal
सातारा

Satara : खंडाळा कारखान्यासाठी 138 अर्ज

21 जागांसाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार

रमेश धायगुडे

लोणंद : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी एकूण १३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. खंडाळा- म्हावशीच्या २१ संचालकांच्या २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीसाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत १३८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

व्यक्ती उत्पादक पाच गटांतील प्रत्येकी तीन जागांसाठी ९८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये खंडाळा- (२२), शिरवळ- (२१), बावडा- (१५), भादे- (२१) व लोणंद- (१९), तर महिला राखीव मतदारसंघातील दोन जागांसाठी ९ अर्ज दाखल झाले आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून एक जागेसाठी (१०), अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी प्रवर्गातील एक जागेसाठी (६), इतरमागास मतदार प्रवर्ग प्रतिनिधी प्रवर्गातील एक जागेसाठी (१०), संस्था व बिगर उत्पादक सभासद प्रतिनिधी प्रवर्गातील एका जागेसाठी (५) असे एकूण १३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कोरोना पूर्वीच्या तीन दिवसांच्या प्रक्रियेत ४७, काल ३८, तर आज ५२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये प्रामुख्याने विद्यमान संचालक मंडळातील

विद्यमान अध्यक्ष शंकरराव गाढवे, विद्यमान उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, संचालक चंद्रकांत ढमाळ, साहेबराव महांगरे, भानुदास जाधव, राजेंद्र ऊर्फ अनंत तांबे, विशाल धायगुडे, बंडू राऊत, धनाजी डेरे, हणमंतराव साळुंखे, साहेबराव कदम, बापूराव धायगुडे, पुरुषोत्तम हिंगमिरे, संजीव गाढवे, किसन ननावरे, शिवाजीराव शेळके-पाटील, इंदुमती पाटील, श्रीमती पार्वतीबाई धायगुडे यांनी अर्ज दाखल केले आहेत,

तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे, जिल्हा बँकेचे संचालक व खंडाळा तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे- पाटील, अशोकराव गाढवे, शैलेश गाढवे, श्रीराम गाढवे, अजय भोसले, रमेश सोनवणे, खंडाळा पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत यादव, नारायणराव पवार, धनाजी अहिरेकर, अॅड. गणपतराव शेळके, प्रदीप क्षीरसागर, सुधाकर होवाळ आदींसह विविध गटांत व राखीव मतदारसंघात अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

उद्या (ता. २२) रोजी छाननी प्रक्रिया पार पडणार असून, ता. २३ रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ता. २३ सप्टेंबरपासून ७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

सर्व पक्षांकडून अर्ज दाखल

सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व शिवसेनेही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे कारखान्याची ही निवडणूक सर्वांनीच गांभीर्याने घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, आमदार मकरंद पाटील, किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांची कोणती भूमिका राहणार व काय निर्णय घेणार याकडे खंडाळा तालुक्यासह वाई, कोरेगाव, फलटण, बारामती, पुरंदर व भोर या तालुक्यांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT