patan 
सातारा

आठ किलोमीटर पायपीट करणाऱ्या लक्ष्मीचा शाळेत पहिला नंबर; सैन्यात जाण्याचे स्वप्न

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) ः दररोज आठ किलोमीटरची पायपीट करत शिक्षण घेतलेल्या पाटीलवाडी (रुवले, ता. पाटण) येथील लक्ष्मी संजय साळुंखे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 91.60 टक्के गुण मिळवून सणबूरच्या महात्मा गांधी विद्यालयात पहिला क्रमांक मिळवला. 

दुर्गम डोंगराळ गावांमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झालेली असली, तरी माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठीची विद्यार्थ्यांची पायपीट आजही कायमच आहे. दररोज दहा-पंधरा किलोमीटर चालत जाऊन शिक्षण घेणारे डोंगर कपारीतील विद्यार्थी खासगी शिकवण्या, घरातील अभ्यासाचे वातावरण व मार्गदर्शन आदींचा अभाव असतानाही गुणवत्तेतही अव्वल ठरत असल्याचे आतापर्यंत अनेक उदाहरणातून समोर आले आहे. छोट्याशा पाटीलवाडीतून दररोज आठ किलोमीटरची पायपीट करत सणबूरला जाणाऱ्या लक्ष्मीने दहावीच्या परीक्षेत 91.60 टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिला क्रमांक पटकविल्याने वाल्मीक पठार हरखून गेले आहे. 

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लक्ष्मी ही सणबूर विद्यालयात सेमी इंग्लिशला शिकणारी विद्यार्थिनी आहे. चार किलोमीटरची पायपीट करत शाळेत जाणे आणि तेवढेच अंतर कापत पुन्हा घरी येणे, असा तिचा नित्याचा दिनक्रम. दहावीचे वर्ष असल्याने यंदा तिने अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. पहाटे तीन वाजता उठून तीन-साडेतीन तास आणि सायंकाळी घरी आल्यावर पुन्हा तेवढाच अभ्यास करायचे, असे तिने सांगितले. ती म्हणाली, ""सकाळी लवकर जादा तास सुरू होत असल्याने एकटीच पायपीट करत शाळेत जात होते. दुर्गम भाग असल्याने खासगी शिकवणीचा विषयच आला नाही. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी घेतलेला अभ्यास खूपच उपयुक्त ठरला. आई-वडील, शिक्षकांसह चुलते दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनामुळे प्रोत्साहन मिळाले.'' 


सैन्यदलात सेवा बजावण्याचे स्वप्न 
लक्ष्मीने यापूर्वी निबंध-वक्तृत्वसह विविध स्पर्धातूनही उज्ज्वल यश मिळविले आहे. तिचे वडील संजय हे मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम करतात. सध्या लॉकडाउनमुळे काही महिन्यांपासून ते गावीच असतात. आई गृहिणी आहे. लक्ष्मीची मोठी बहीण कऱ्हाडला महाविद्यालयीन शिक्षण घेते, तर धाकटा भाऊ सणबूरच्या विद्यालयात शिकतो. तिघांही भावंडांनी पायपीट करतच माध्यमिक शिक्षण घेतले आहे. भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून सेवा बजावण्याचे लक्ष्मीचे स्वप्न आहे. त्यासाठी तिने सरावही सुरू केला आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT