बिबट्या sakal
सातारा

सातारा : बिबट्यामुळे ऊसतोड मजूर गेले निघून; दहशतीने शिवारेही पडली ओस

बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी जोर धरू लागली आहे.

विलास खबाले

सातारा (विंग) : येणके येथे बिबट्याने हल्ला करून पाच वर्षांच्या मुलाचा बळी घेतला. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. त्यास सुरक्षितस्थळी सोडण्यास हलवले. त्यानंतर आणखी एक बिबट्या तेथे हजर झाला. त्यामुळे येणकेकरांची झोप उडाली आहे. ऊसतोडणी मुजरांनी तर तेथून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे ऊसतोडणीचा प्रश्न उभा आहे. बिबट्याच्या दहशतीने शिवारात जायला लोक घाबरत आहेत. भीतीपोटी पाचच्या आत घरात अशी गत त्यांची झाली आहे. बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी जोर धरू लागली आहे.

ऊसतोडणी मजुराच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्यास ठार मारल्याची घटना येणकेत मागील पंधरावड्यात दिवसाढवळ्या घडली. त्यामुळे येणकेकरांच्या मनात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याच्या बंदोबस्ताची वन विभागाने मोहीम राबवली. ठिकठिकाणी त्यासाठी पिंजरे लावले. ट्रॅप कॅमेर लावले. त्यात बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्याला सुरक्षितस्थळी गाडीतून हलवले. तोवर दुसरा बिबट्या त्याच परिसरात दिसला. त्यामुळे गावकऱ्यांची आता झोपच उडाली आहे.

नेमके बिबटे किती आहेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी हल्ल्याच्या भीतीने लोक शिवारात जायला घाबरत आहेत. शेतीची कामे त्यामुळे खोळंबली आहेत. बिबट्याच्या भीतीने ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्यांनी तेथून काढता पाय घेतला आहे. टोळ्या तेथून निघून गेल्या आहेत. त्यामुळे ऊसतोडणीचा प्रश्न उत्पादकांसमोर आता उभा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT