Satara Lok Sabha 2024 esakal
सातारा

Satara Lok Sabha 2024: छत्रपतींची गादी की पवारांचा निष्ठावंत? साताऱ्यात कोण मारणार बाजी?

Satara Lok Sabha 2024: २०२४ ची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी स्पेशल आहे. कारण, राज्यातील समीकरणं बदलली आहेत. अशातच राज्यातील छत्रपती शिवरायांच्या दोन्ही गाद्या यंदा लोकसभा निवडणुकीत उतरल्या आहेत.

Komal Jadhav (कोमल जाधव)

Satara Lok Sabha 2024:

सातारा लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. छत्रपतींची गादी असणारे उदयनराजेंना भाजपनं लोकसभेची उमेदवारी दिली आहे तर महाविकासआघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शशिकांत शिंदेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे साताऱ्यात कुणाचं पारडं जड? छत्रपतींची गादी की पवारांचा निष्ठावंत? साताऱ्यात कोण मारणार बाजी? जाणून घेऊया...

२०२४ ची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी स्पेशल आहे. कारण, राज्यातील समीकरणं बदलली आहेत. अशातच राज्यातील छत्रपती शिवरायांच्या दोन्ही गाद्या यंदा लोकसभा निवडणुकीत उतरल्या आहेत. म्हणजे साताऱ्यातून उदयनराजे भोसले भाजपच्या कमळ या निवडणूक चिन्हावर लढणार आहेत तर कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती काँग्रेसच्या पंजा चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे छत्रपतींच्या गादींना आव्हान देण्यासाठी समोरच्या विरोधी पक्षाला मोठं आव्हान उभं राहिलंय.

आता बोलूयात सातारा लोकसभा मतदारसंघाविषयी...

सातारा लोकसभा मतदारसंघ कायम काँग्रेसच्या विचारधारेकडे झुकलेला मतदारसंघ राहिला आहे. 1996 ची निवडणूक वगळता या मतदारसंघावर कायम काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलं आहे. इतिहासात जायचं झालं तर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सातारा दक्षिण आणि सातारा उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचेच उमेदवार निवडून गेले होते. तर, किसन वीर यांनीही सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.

१९६७ ते १९८४ दरम्यान यशवंतराव चव्हाण यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या निवडणुकीत रायबरेलीतून इंदिरा गांधींचा पराभव झाला, मात्र साताऱ्यातून यशवंतराव चव्हाण आणि कराडमधून प्रेमलाकाकी चव्हाण या भरघोस मताधिक्याने जिंकून आल्या होत्या. त्यामुळे सातारा हा कायम काँग्रेससाठी बालेकिल्ला राहिला आहे. 

प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले यांनीही सातारा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्यामुळे सातारकरांनी काँग्रेसला नेहमीच भक्कम साथ दिली आहे. आधी म्हटल्याप्रमाणे १९९६ ची लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी अपवाद ठरली. कारण त्यावेळी इथून शिवसेनेचे हिंदुराव निंबाळकर निवडून आले. अर्थात त्यालाही काँग्रेसमधील अंतर्गत कलह कारणीभूत ठरल्याचं बोललं गेलं. आणि याचवर्षी उदयनराजेंनी सक्रीय राजकारणात एन्ट्री घेतल्याचं बोललं जातं. कारण १९९६च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

१९९९ साली शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर काँग्रेसचा हा बालेकिल्ला पवारांच्या राष्ट्रवादीनं काबीज केला. कारण त्यानंतर इथून कायम राष्ट्रवादीचेच खासदार संसदेत गेले.

साताऱ्यातून संसदेत गेलेले राष्ट्रवादीचे खासदार

१९९९-२००४- लक्ष्मणराव जाधव-पाटील

२००४-२००९- लक्ष्मणराव जाधव-पाटील

२००९-२०१४- उदयनराजे भोसले

२०१४-२०१९ - उदयनराजे भोसले

मे २०१९ ते सप्टेंबर २०१९- उदयनराजे भोसले

२०१९ पोटनिवडूक - श्रीनिवास पाटील

त्यामुळे पवारांसाठी सातारा जिल्हा आणि सातारा लोकसभा मतदारसंघ का महत्वाचा आहे?, हे आपल्याला कळालं असेलच. आता २०१९ विधानसभा निवडणुकीनुसार सातारा लोकसभा मतदारसंघातील आमदारांचं पक्षनिहाय बलाबल समजून घेऊयात...

सातारा लोकसभेतलं विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षीय बलाबल

वाई मकरंद पाटील राष्ट्रवादी (अजित पवार गट)

कोरेगाव   महेश शिंदे  (शिवसेना शिंदे गट)

कराड उत्तर बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)

कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)

पाटण शंभूराज देसाई (शिवसेना शिंदे गट)

सातारा शिवेंद्रराजे भोसले (भाजप)

बदलत्या राजकीय समीकरणांमुळे सातारा लोकसभेची लढतही यंदा रंजक होऊ शकते आणि ती दोन्ही बाजूंसाठी टफ फाईटही ठरू शकते. कारण, आधी सांगितल्याप्रमाणे, सातारा जिल्ह्यानं कायम शरद पवारांना साथ दिली आहे. मग ते २०१९ मध्येही पाहायला मिळालं. कारण २०१९ साली राष्ट्रवादीकडून खासदार झाल्यानंतरही उदयनराजेंनी ५ महिन्यातच खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात पक्षप्रवेश केला. त्यानंतर इथे पोटनिवडणूक लागली.

शरद पवार यांचे मित्र श्रीनिवास पाटील तेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत पवारांनी केलेलं पावसातलं भाषण आजही सोशल मीडियावर व्हायरल होतं. आणि या एका सभेनं २०१९चं संपूर्ण चित्र बदललं. उदयनराजेंचा पराभव करत पवारांचा शिलेदार श्रीनिवास पाटील जिंकून आले होते. २०१९ च्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटलांना सातारा आणि कोरेगाव वगळता इतर चारही विधानसभा मतदारसंघात चांगलं मताधिक्य मिळालं होतं. आणि ते विजयी झाले होते.

पण, यंदा श्रीनिवास पाटलांनी तब्येतीचं कारण देत लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. अन् मग महाविकासआघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली. तर, मविआचा उमेदवार घोषित झाल्यानंतरही आठवडाभर महायुतीचा उमेदवार घोषित झालेला नाही. अखेर १६ एप्रिलला भाजपनं उदयनराजेंची उमेदवारी जाहीर केली. खरंतर साताऱ्यातून नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसलेसुद्धा महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. 

तरी, उमेदवारीसाठी दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या उदयनराजेंची दिल्लीवारी सफल झाल्याचे दिसून येते. तरी, १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस अन् पवारांना साथ देणारे सातारकर यंदा कुणाची साथ देणार? हे पाहणं महत्वाचं असेल. २०१९ साली पवारांनी भरपावसात केलेलं  भाषण टर्निंग पॉईंट ठरलं होतं. आणि त्या सभेमुळेच पवारांची साताऱ्यावरची पकड आणखी मजबूत झाल्याची त्यावेळी चर्चा झाली होती. आता यंदा २०२४ ला साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT