satara city system
सातारा

सातारकरांनाे! संयम बाळगा, नाही तर पुन्हा लॉकडाउनच्या छायेत

गिरीश चव्हाण

सातारा : एक महिन्यांच्या कालावधीनंतर काही अंशी अनलॉक (unlock) केल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज (साेमवार) साताऱ्याच्या विविध भागातील रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. या गर्दीत बेफिकिरांचीच वर्दळ जास्त असल्याचे दिसून आले. या बेफिकिरांमुळे अनलॉकचा उद्देश धोक्‍यात येवून आगामी काळात जिल्हा पुन्हा एकदा लॉकडाउनच्या (lockdown) चक्रात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. (satara-marathi-news-citizens-over-crowded-in-market-break-the-chain)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (covid-19 second wave) सातारा जिल्ह्यात विराट रुप धारण केले होते. दिवसागणिक अडीच हजारांच्या घरात बाधित सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागल्याने बाधितांच्या आकडेवारीच्या यादीत जिल्हा टॉप टेन यादीत जावून पोहोचला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनची कडक अंमलबजावणीचा निर्णय घेत अत्यावश्‍यक सोडून सर्व बाजारपेठा बंद ठेवल्या. राज्य शासनाच्या नियमावलीनुसार जिल्हा चौथ्या टप्प्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून काही अंशी अनलॉक धोरण जाहीर केले. याच धोरणामुळे साताऱ्यातील विविध भागातील रस्त्यांवर नागरीकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. जीवनाश्‍यक वस्तु व इतर महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांबरोबरच सहज फिरण्यासाठी बाहेर पडलेल्यांचाही त्यामध्ये जास्त समावेश होता.

गेले अनेक दिवस सुनासुना असणारा राजवाडा, मंडई, राजपथ, पोवई नाका, बसस्थानक परिसर तसेच इतर भागातदेखील नागरीकांची विविध कारणांसाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे पुन्हा एकदा कोरोनाला आमंत्रण मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पहिल्याच दिवशी बेफिकिरीने फिरण्यावर अनेकांनी भर दिल्याने अनलॉकमुळे गती घेण्याच्या तयारीत असणारे अर्थचक्र पुन्हा एकदा लॉकडाउनच्या साखळीत जखडले जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने त्या जिल्ह्यांतील नागरिकांना इतर चार टप्प्यातील जिल्ह्यांत येण्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात येणा-या नागरिकांनी या आदेशाचे तंताेत पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई हाेऊ शकते. याबराेबरच नागरिकांनी मास्कचा वापर करावा. तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे. अन्यथा दंडात्मक कारवाई हाेऊ शकते.

vaccination

काळजी घेणेच हिताचे...

मास्कचा वापर आवश्‍यक

विनाकारण बाहेर पडू नका

सॅनिटायझरचा वापर गरजेचा

कोरोना संपला अशा अविर्भावात राहू नका

परिसरातील दुकानांतच साहित्य खरेदी करा

भाजी, किराणा खरेदीसाठी अनावश्‍यक गर्दी नको

आपल्याबरोबर इतरांची काळजी घ्या

आपले अनलॉक आपल्याच हाती हे लक्षात राहू द्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT