नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे Sakal
सातारा

महाबळेश्वरच्या विकासात विरोधकांमुळे अडथळे : स्वप्नाली शिंदे

चांगल्या कामात खोडा घालण्याच्या धोरणामुळे शहर विकासात अडथळे निर्माण होत आहेत.

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपालिकेने भाजी मार्केट खासगी विकसकाकडून नियमानुसार केलेल्या बांधकामाला शासनाने मंजुरी दिली असतानाही स्थानिक गाळेधारकांचा कोणताही विचार न करता विरोधकांचा चांगल्या कामात खोडा घालण्याच्या धोरणामुळे शहर विकासात अडथळे निर्माण होत आहेत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाबळेश्वरकर विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा निश्चित दाखवतील, असे नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले.

पालिकेच्या सत्ताधारी व विरोधी गटामध्ये सुरू असलेला वाद व नूतन भाजी मार्केट उद्‍घाटनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या विरोधी गटातील नगरसेवकांनी केलेल्या तक्रारी व आरोपांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा शिंदे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘२००६ पासून प्रलंबित असलेल्या मुख्य बाजारपेठेतील गाळे, भाजी मार्केट व मटण मार्केटच्या इमारतीबाबतचे प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचले होते.

उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम करून या इमारतीच्या मंजूर नकाशानुसार बांधकाम करण्याचे निर्देश पालिकेस दिले होते. तद्‌नंतर पालिका व भाडेकरू गाळेधारक यांनीही या विषयास मंजुरी दिल्यानंतर, तसेच त्यांचे नगरपालिकेने स्वखर्चाने तात्पुरते स्थलांतर करून देण्याच्या अटी शर्तीवर संमती दिली होती. त्यानुसार २०१६ मध्ये प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या तक्रारींमुळे अप्रत्यक्षरीत्या कामामध्ये अडथळा निर्माण होत होता.

भाजी मंडई, मटण मार्केटचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विकसकांनी याबाबत पालिकेस पत्रव्यवहार केले होते. त्यानंतर नगरपालिका पाहणी करून या कामाचा पूर्णत्वाचा दाखला दिला. नवीन इमारत असल्याकारणाने भाडे निश्चित करण्यासाठी प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठवण्यात आला. या बांधकामांमध्ये असलेल्या काही त्रुटींबाबत नगररचना विभागाने नगरपालिकेस कळविल्यानंतर काही त्रुटींबाबत या प्रकरणात या प्रकल्पाचा फेर बांधकाम प्रस्ताव सादर करण्यात आला.

या नकाशाची पडताळणी नगररचना विभागाने करून बांधकाम नकाशा मंजुरी दिली आहे, तरी विरोधकांच्या म्हणण्यानुसार काही त्रुटी असतील तर त्यादेखील उद्‍घाटनापूर्वीच दूर केल्या जातील. दोन वर्षे रखडलेल्या या भाजी व मटण मार्केटच्या ४० गाळेधारकांना गाळे हस्तांतरण करण्यासोबतच या इमारतीचे उद्‍घाटन करण्याचे नियोजन केले असताना राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांनी विरोध म्हणून या नूतन वास्तूचे उद्‍घाटन होऊ नये व गोरगरिबांना उदरनिर्वाहासाठी गाळे मिळू नयेत, तसेच विकसकाकडून टक्केवारीसाठी तक्रारी देऊन उद्‍घाटन होऊ नये या कलुषितवृत्तीने खोडा घालण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्रुटी दूर करून मार्केट लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’

या वेळी ज्येष्ठ नगरसेवक युसुफभाई शेख, गाळेधारक सलीम बागवान, विकसक बाबूभाई कन्स्ट्रक्शनचे सत्तारभाई शेख व माजी नगरसेवक मुबारक भाई शेख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT