Satara  esakal
सातारा

Satara : मायणीत रिंगावण यात्रेत राजकीय धुळवड; ‘यशोदीप’साठी अर्ज का भरले नाहीत? गुदगे

डॉ. येळगावकरांनी ४० कोटींची यशोदीप पतसंस्था बुडवल्याचे सांगत गुदगे म्हणाले

सकाळ डिजिटल टीम

कलेढोण : यशोदीप पतसंस्थेच्या ठेवी परत देणार होता? तर निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणुकीसाठी अर्ज का भरले नाहीत? अर्थात माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकरांनी आपल्या जबाबदारीतून पळ काढला, तर यात्राकाळात कुस्तीच्या दिवशी बैलगाड्यांसाठी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागणे, हा विरोधकांचा खोडसाळपणा असल्याचा आरोपही जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केला.

डॉ. येळगावकरांनी ४० कोटींची यशोदीप पतसंस्था बुडवल्याचे सांगत गुदगे म्हणाले, ‘‘येळगावकर जाहीर सभेत बोलतात, की माझी ठेवीपेक्षा जास्त रकमेची कर्जे आहेत. त्यामुळे ठेवीदाराचाही एक रुपयाही मी बुडवणार नाही. यशोदीप पतसंस्थेवर शासनाकडून प्रशासक नेमला आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी देण्याच्या जबाबदारीतून त्यांनी पळ काढला आहे. त्यामुळेच प्रशासक नेमला आहे.

गुदगे म्हणाले...

श्रीनाथबाबांचा जीर्णोद्धार पूर्ण केला

पिढ्यान्‌पिढ्यांच्या यात्रेला फाटा का?

मार्च २०२४ पर्यंत पाणीयोजना पूर्ण करणार

मायणीत कोट्यवधींचे कामे केली

सर्व रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण करणार

डॉ. येळगावकरांवरील आरोप...

ग्रामपंचायत सत्ता ताब्यात असताना बाजार पटांगण दिले नाही.

दु:खात आहे म्हणता तर मग माध्यमांवर पोस्ट कशा?

लोकांचा व कार्यकर्त्यांचा विश्‍वास गमावला.

मायणी गटात घरातीलच भाजप उमेदवार : येळगावकर

मायणीतील रिंगावण यात्रेत माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकरांनी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत मायणी गटातून भाजपमधून आपल्या घरातीलच उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पारंपरिक विरोधक असलेल्या सुरेंद्र गुदगेंच्या विरोधात भाजपमधून अभिजित येळगावकर की रेणू येळगावकर? हे येत्या काळातच समजणार आहे. रिंगावण यात्रेत बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले, ‘‘मी यशोदीपच्या जबाबदारीतून कधीही पळ काढला नाही. आता जिल्हा परिषदेची निवडणूक येईल. त्यात मी भाजपमधून माझ्या घरातला उमेदवार देणार आहे,’’ असे सांगत येळगावकरांनी मायणीच्या रिंगावण यात्रेत आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे चित्रही स्पष्ट केले.

डॉ. येळगावकर म्हणाले...

मातोश्री सरुताईंचे सुसज्ज मंदिर बांधले

माझ्यावर संकट आले, पळ काढला नाही

टेंभू योजनेचे पाणी आणले

मी कोणासमोर नमत नाही

मेडिकल कॉलेजच्या अध्यक्ष पदाचा स्वत: राजीनामा दिला

गुदगेंवरील आरोप...

तुमच्या बंधूमुळे ग्रामपंचायतीची सत्ता गेली.

यशोदीपच्या कर्जदाराला पैसे भरून दिले नाहीत.

स्वत:च्या बँकेचे पाहावे.

मायणी बॅंकेचा गैरवापर होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT