Dr. Bharat patankar Esakal
सातारा

'आता एवढेच ठरवायचे आहे महामारीने, उपासमारीने, की लढून मरायचे'

या दहा वर्षांच्या विलंबाबद्दल प्रशासनाने प्रामाणिकपणे या धरणग्रस्तांची माफी मागितली पाहिजे. याविषयी कोणतेही समर्थन करणे म्हणजे या प्रकल्पग्रस्तांचा अवमान करण्यासारखेच आहे, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

सिद्धार्थ लाटकर

या दहा वर्षांच्या विलंबाबद्दल प्रशासनाने प्रामाणिकपणे या धरणग्रस्तांची माफी मागितली पाहिजे. याविषयी कोणतेही समर्थन करणे म्हणजे या प्रकल्पग्रस्तांचा अवमान करण्यासारखेच आहे, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

सातारा : कोणताही पर्याय उरलेला नसल्यामुळेच कोयना प्रकल्पग्रस्तांनी koyna dam project affected people लढा सुरू केला आहे. त्यांना एवढेच ठरवायचे आहे, की महामारीने, उपासमारीने, की लढून मरायचे. येत्या सोमवारपासून (ता. 24) कोयना प्रकल्पग्रस्त हे सकाळचे जेवण घेणे बंद करतील. हा निर्णय कोयनेला सांगण्यासाठी कोयना जलाशय, कोयना नदीवर प्रातिनिधिक स्वरूपात जाऊन या निर्णयाची शपथ घेतील, अशी माहिती धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर bharat patankar यांनी दिली. satara-marathi-news-bharat-patankar-addressed-media-koyna-project-affected

कोयना धरण झाले आणि महाराष्ट्राला विकासाचा आधार असलेली वीज मिळाली. या विजेबरोबरच कोयनेच्या पाण्यातून लाखो एकर जमीन बागायती झाली. या आधारावर सहकारी आणि खासगी उद्योग भांडवल कमवत आहेत. अशा वेळी 64 वर्षे उलटून गेल्यानंतरही कोयना धरणग्रस्तांचे विकसनशील पुनर्वसन बाजूलाच; पण साधे पुनर्वसनही होऊ शकले नाही, याविषयी दुःख होण्याऐवजी किंवा 64 वर्षे झालेल्या उशिराबद्दल खंत वाटण्याऐवजी उशिराचे समर्थन होणे म्हणजे या प्रकल्पग्रस्तांच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असे धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी नमूद केले. ही परिस्थिती गेले दहा वर्षे सुरू आहे. पात्र प्रकल्पग्रस्तांची प्रमाणित यादी तयार करण्याचा निर्णय मंत्रालय पातळीवर 2018 मध्ये झाला असला, तरी जिल्हा पातळीवर हा निर्णय 2009- 10 मध्येच झालेला आहे.

या सर्व काळात महामारी किंवा कोणतीही साथ नव्हती किंवा मंत्रालय पातळीवर निर्णय झाला तेव्हा 2018- 19 ला महामारी, साथ किंवा कोरोना नव्हता, मग उशीर का झाला, याचे उत्तर कोण देणार, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

या दहा वर्षांच्या विलंबाबद्दल प्रशासनाने प्रामाणिकपणे या धरणग्रस्तांची माफी मागितली पाहिजे. याविषयी कोणतेही समर्थन करणे म्हणजे या प्रकल्पग्रस्तांचा अवमान करण्यासारखेच आहे, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले. या वेळी हरिश्‍चंद्र दळवी, मालोजीराव पाटणकर, सचिन कदम, महेश शेलार, चैतन्य दळवी, प्रकाश साळुंखे, सीताराम पवार, रामचंद्र कदम व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT