सातारा : येथील सिव्हील हाॅस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लस (covid 19 vaccination drive) घेण्यासाठी आज (रविवार) पहाटे पाचपासून नागरिकांची गर्दी झाली हाेती. सकाळी सहा पासून नागरिकांची रांग वाढू लागली. अवघ्या तासाभरात ही रांग रुग्णालयाच्या बाहेर सुमारे 500 मीटर पर्यंत वाढली. या रुग्णालयात आज सुमारे 700 नागरिकांना कोव्हॅक्सिनची लस (covaxin) देण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून कूपनचे वाटप करण्यात आले. दरम्यान, लशी पुरवठाबाबत योग्य नियोजन नसल्याने दररोज गोंधळ उडत असल्याचे चित्र सातारा शहरात आहे. (satara marathi news covaxin citizens civil hospital)
साता-यातील जिल्हा रुग्णालयात ४५ ते ६० वयोगटांतील कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात आहे. पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतल्यानंतर या वयोगटातील नागरिकांना दुसरा डोसच मिळत नसल्याने व मुदत संपल्याने वणवण भटकावे लागत होते. दरम्यान १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे कोव्हिशील्डचे लसीकरण सुरू झाले. मात्र अद्यापही हजारो युवकांचे लसीकरण बाकी असताना मध्येच कोव्हॅक्सिन लस आली. तेही फक्त दुसरा डोस म्हणून देण्यात येत आहे. पहिली कोव्हॅक्सिन घेतलेल्या जिल्ह्यातील अनेकांनी दुसऱ्या डोससाठी आज (रविवार) साता-यात धाव घेतली.
प्रत्येकाला लस घेणे सोयीस्कर ठरावे यासाठी कुपन दिले जातात. हे कूपन सकाळी नऊला कुपन देत असे. मात्र कूपन मिळावे म्हणून नागरिक सकाळी लवकर येऊ लागले. समाज माध्यमातून शनिवारी रात्री काेव्हॅक्सिनचा दूसरा डाेस जिल्हा रुग्णालयात उपलब्ध हाेणार असल्याचा संदेश फिरला. त्यामुळे आज (रविवार) चक्क पहाटे पाचपासून लोक रुग्णालयात आले. वाढती गर्दी लक्षात घेऊन सातलाच कूपन वाटायला कर्मचाऱ्यांनी प्रारंभ केला.
हे कूपन घेतल्यानंतर नागरिकांना जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रात साेडण्यात येत हाेते. तेथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खूर्चीची सुविधा हवी असे काहींनी नमूद केले. दरम्यान जिल्हा रुग्णालयाबराेबरच ग्रामीण भागात देखील आज काेव्हॅक्सिनचा दूसरा डाेस देण्यासाठी लसीचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली. यामध्ये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.