सातारा

व्हा लाभार्थी! ३३ टक्के सवलत देऊनच सुरु झालीय FasTag ची अंमलबजावणी

सिद्धार्थ लाटकर/प्रशांत गुजर

सातारा/सायगाव : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाका येथे फास्टॅगची (FasTag) मंगळवारपासून अंमलबजावणी सुरु झालेली आहे. आज (बुधवार) दूस-या दिवशी किरकाेळ वाद वगळता वाहनधारक त्यांच्या वाहनासाठी FasTag घेताना दिसत हाेते. सुरुवातीच्या एक-दोन तासांमध्ये वाहनचालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने टोलनाक्यावर तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर सुरळीतपणे टोल वसूली आणि वाहतुक सुरु आहे.

वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक केल्यामुळे फास्टॅग नसणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसुली करण्यात येत आहे. पुणे- बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्‍यावर वाहनधारक आणि टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांमध्ये मंगळवारी (ता.16) वादावादीचे प्रकार घडले. त्यातून टोलनाक्‍यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या हाेत्या.

आज (बुधवार) फास्टॅग सुविधा न वापरणाऱ्या अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंडासह टोल वसूलही करण्यात येत आहे. महामार्गाच्या सातारा ते पुणे व पुणे ते सातारा या दोन्ही बाजूकडील सर्व लेनवर फास्टॅग सुविधेचा वापर आनेवाडी टोल प्रशासनाकडून अनिवार्य करण्यात आला आहे. 

फास्टॅगबाबत स्थानिक वाहनचालकांमध्ये उलट-सुलट चर्चा होती. परंतु  आनेवाडी टोलनाका प्रशासनाने वैयक्तिक स्थानिक वाहनांना २७५ रुपयांचा फास्टॅग देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबराेबरच स्थानिक व्यावसायिक वाहनांनासुद्धा फास्टॅगमध्ये ३३ टक्के सवलत देत असल्याचे नमूद केले. त्यामुळे स्थानिक वाहनचालकांनी फास्टॅगबाबत संभ्रम निर्माण न करता या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन टाेलप्रशासनाने केले आहे.

असा आहे सवलतीचा नियम

आनेवाडी टाेल नाका येथून 21 किलाेमीटर परिसरात असणा-या गावातील वाहनधारकांना ही सवलत दिली जात आहे. संबंधित वाहनधारकांनी आधार कार्ड , वाहनाची कागदपत्र, पॅन कार्ड, एटीएम कार्ड टाेल नाका प्रशासन कार्यालयात जाताना साेबत न्यावे. तेथे सवलत असणा-या गावांची यादी उपलब्ध आहे. त्यानूसार सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत स्थानिकांना सेवा दिली जात आहे.

FasTag कसं मिळवाल आणि कधीपर्यंत असते वॅलिडिटी? वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT