लाखमोलाचा जीव वाचविताना अशा आव्हानात्मक मोहिमेत सहभागी होण्याची संधी लाभणे ही भाग्याची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया लोखंडे यांनी फोनवरून "ई-सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.
सातारा : जीवन मरणाच्या लढाईत कित्येकांची आयुष्ये हेलकावे खात असताना नौदलाचे जवान indian navy soldier देवदूत म्हणून उभे राहिले. तौक्ते चक्रीवादळाच्या tauktae cyclone रूपाने उभ्या ठाकलेल्या या आव्हानाला नौदलाच्या या जवानांनी निकराची झुंज दिली. त्यातून शेकडो जीव बचावले. या मोहिमेत पांगरी (ता. माण) येथील सुपुत्राचाही समावेश होता. satara-marathi-news-mahesh-lokhande-saved-lifes-tautake-cyclone-trending
महेश लोखंडे mahesh lokhande असे या सुपुत्राचे नाव आहे. ते भारतीय नौदलात कार्यरत आहेत. तौक्ते चक्रीवादळातील तुफान वाऱ्यामुळे अरबी समुद्रात जहाजावर अडकलेल्या हजारो व्यक्तींना सुखरूप वाचविण्यासाठी भारतीय नौदल अन् तटरक्षक दलाच्या जवानांनी मोहीम राबविली. त्यातील एका बचाव पथकात लोखंडेंचा समावेश होता. खवळलेला समुद्र, उंचच उंच लाटा, प्रचंड वेगाने वाहणारे वारे, दाटलेला काळोख अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुमारे दोन हजार जवानांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कित्येकांचे प्राण वाचविले. ही मोहीम यशस्वी करून दाखविली. लाखमोलाचा जीव वाचविताना अशा आव्हानात्मक मोहिमेत सहभागी होण्याची संधी लाभणे ही भाग्याची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया लोखंडे यांनी फोनवरून "ई-सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून लोखंडे हे पुढे आले आहेत. ऊसतोडणी दांपत्याच्या या मुलाने मोठ्या अत्यंत जिद्दीने, खडतर मेहनतीने आपले शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करत नौदलात प्रवेश मिळविला. 2009 मध्ये ते भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाले आहेत. गोवा, विशाखापट्टणम येथेही काही काळ त्यांनी सेवा बजाविली आहे. सध्या ते मुंबईत कार्यरत आहेत. या साहसी मोहिमेतील योगदानाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महेश यांचा प्रवास जिद्दीचा आहे. पांगरीतील प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण करून ते वसतिगृहात राहून शिकले. परिस्थितीच्या प्रखर जाणिवेतून त्यांनी स्वतःला घडविले आहे. त्यांनी बजाविलेली ही अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद ठरणारी आहे.
- बिरा लोखंडे, महेश यांचे चुलत भाऊ, पांगरी (ता. माण)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.