Railway esakal
सातारा

ग्रामस्थांना विश्वास आपले खासदाराच साेडवतील रेल्वेचा प्रश्न

रेल्वेला मिळणाऱ्या महसुलाचा विचार करून शेणोलीस एक्‍स्प्रेस थांबणे गरजेचे आहे. 2014 पासून आम्ही त्यासाठी पाठपुरावा करत आहोत. खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाठपुरावा केल्यास तो प्रश्न मार्गी लागेल. असे पांडुरंग सूर्यवंशी यांनी नमूद केले.

अमाेल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : रेल्वे विभागाने (Railway Ministry) शेणोली स्टेशनला (Shenoli Station) दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या पायलट प्रकल्पातून सोनेरी झळाळी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मिरज-पुणे लोहमार्ग (Miraj Pune) दुहेरीकरण व विद्युतीकरणाची मुहूर्तमेढ शेणोलीला रोवली असतानाच त्या स्टेशनला मात्र एक्‍स्प्रेस गाड्या थांबण्याची प्रतीक्षाच आहे. "कोयना' व "महाराष्ट्र' एक्‍स्प्रेसला (Koyna Express) (Maharashtra Express) थांबा मिळण्यासाठी परिसरातील नागरिकांचा सात वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवर त्यांच्या या मागणीस दाद मिळत नाही. त्यामुळे एक्‍स्प्रेस थांब्याला रेल्वेकडून ग्रीन सिग्नलच मिळेना झाला आहे. (satara marathi news shenoli railway station express train stop)

कऱ्हाड व सांगली जिल्ह्यांतील वाळवा, कडेगाव तालुक्‍यांतील सुमारे 25 गावांना शेणोलीचे रेल्वे स्टेशन मध्यवर्ती आहे. अनेक बाजूंनी उपयोगी राहणाऱ्या या स्टेशनला केवळ पॅसेंजर गाडी थांबते. हे स्टेशन बाजारपेठ व राष्ट्रीय महामार्गानजीक असणारे आहे. रेल्वेने लोहमार्ग दुहेरीकरण व विद्युतीकरणास शेणोलीपासून प्रारंभ केला. त्यासाठी स्टेशनवर सर्व सोयी केल्या आहेत. स्टेशनवर सकाळी व रात्रीची पॅसेंजर तेथे थांबते. त्यातून दरवर्षी 15 लाख रुपयांचा महसूल रेल्वेस मिळतो.

तेथून जवळच्या यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना व सोनहिरा साखर कारखाना, कृष्णा महाविद्यालय, कृष्णा कृषी महाविद्यालय, जयवंतराव भोसले अभियांत्रिकी महाविद्यालय त्यातील विद्यार्थी, कर्मचारी रेल्वेतून ये-जा करतात. पॅसेंजरपेक्षा एक्‍स्प्रेसमधून प्रवास करणे सोयीचे ठरते. त्यामुळे 2014 मध्ये परिसरातील नागरिकांनी एक्‍स्प्रेस थांबवण्यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी त्याला ग्रीन सिग्नल दिला. मात्र, कार्यवाही झाली नाही. सध्या या स्टेशनचे रुपडे पालटले आहे. स्टेशन सोनेरी झालर पांघरून तयार असतानाही या स्टेशनला एक्‍स्प्रेस थांबण्याची प्रतीक्षाच आहे.

रेल्वेला मिळणाऱ्या महसुलाचा विचार करून शेणोलीस एक्‍स्प्रेस थांबणे गरजेचे आहे. 2014 पासून आम्ही त्यासाठी पाठपुरावा करत आहोत. खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाठपुरावा केल्यास तो प्रश्न मार्गी लागेल.

- पांडुरंग सूर्यवंशी, प्रवासी, शेणोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT