DOCTOR ESAKAL
सातारा

पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याची खरी माहिती समोर आली; डाॅक्टरांना चाप

प्रशांत घाडगे

सातारा : कोरोना संशयित व बाधित रुग्णांच्या (covid19 patients) संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटिजेन (rapid anitgen test) अथवा आरटीसीपीआर (RT-PCR) चाचणीची माहिती आयएमसीआर (imcr) पोर्टलवर न भरणाऱ्या जिल्ह्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीत तफावत असल्याचे दिसून आल्याने राज्यभरात जिल्हा प्रशासनाचे अपयश दिसून आले. (satara-marathi-news-zilla-parishad-health-department-issued-notice-11-doctors)

कोरोनाची रॅपिड अँटिजेन टेस्ट अथवा आरटीसीपीआर टेस्टच्या चाचण्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व काही मान्यताप्राप्त खासगी लॅबमध्ये करण्यात येत आहेत. मात्र, मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णदर राज्याच्या दरापेक्षा खूप जास्त आला. यामध्ये अनेक तालुक्‍यांत दोन दिवस रुग्णसंख्या जास्त, तर त्यानंतर रुग्णसंख्येचा दर एकदम घसरल्याचे दिसून आले. दरम्यान, चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्या उपस्थितीत जिल्हा कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीत रॅपिड अँटिजन टेस्टच्या आकडेवारीतील तफावतीबाबत नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करावी व सुधारणा न झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेने कडक पाऊल उचलत कामात निष्काळजीपणा करण्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.

दरम्यान, रुग्णांच्या चाचण्यांची माहिती न भरणाऱ्या आरोग्य केंद्रातील डॉ. पी. आर. कदम (तारळे, ता. पाटण), डॉ. शीतल सोनवलकर (फलटण), डॉ. सारंग वाघमारे (तडवळे, ता. कोरेगाव), डॉ. उमेश गोंजारी (तळमावले, ता. पाटण), डॉ. संदीप खताळ (बिबी, ता. फलटण), डॉ. रसिका गोखले (गोडोली नागरी आरोग्य केंद्र), डॉ. दीपक थोरात (कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्र), डॉ. रामेश्‍वर सोडमिसे (साखरवाडी, ता. फलटण), डॉ. आदित्य गुजर (पुसेगाव, ता. खटाव), डॉ. ए. आर. ठिगळे (पुसेसावळी, ता. खटाव), डॉ. लक्ष्मण साठे (निमसोड, ता. खटाव) यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकाराचा खुलासा आठ दिवसांत करावा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा श्री. गौडा यांनी दिला आहे.

माहिती न भरल्याने बाधितांचा रुग्णदर वाढला

आरोग्य यंत्रणेने बाधितांच्या आकडेवारीच्या पडताळणीत पंचायत समिती स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र व मान्यताप्राप्त खासगी लॅबमधील रॅपिड अँटिजेन टेस्टची माहिती संकलित केली. यात प्रत्यक्षात केलेल्या चाचणीची संख्या व पोर्टलवर अपलोड केलेल्या चाचण्यांच्या संख्येत तफावत आढळून आली. यामध्ये प्रामुख्याने निगेटिव्ह चाचण्यांचे निष्कर्ष अपलोड केले नसल्याचे निदर्शनास आले. यामुळेच जिल्ह्याचा बाधित रुग्णदर (पॉझिटिव्हिटी रेट) वाढल्याची आकडेवारी समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT