Mahabaleshwar Rain esakal
सातारा

Mahabaleshwar Rain : दुष्काळाशी झुंज देणाऱ्या 'या' तालुक्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस; पंधरवड्यात 332 टक्के पर्जन्यमान

रूपेश कदम

माणमध्ये १ जून ते १७ जूनपर्यंत सामान्यपणे ५९.६ मिलिमीटर पाऊस पडतो; पण प्रत्यक्षात यंदा या कालावधीत एकूण १७ दिवसांपैकी सरासरी ९ दिवस पाऊस पडला.

दहिवडी : माण तालुक्यावर (Man Taluka Rain) जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच वरुणराज प्रसन्न झाल्याने ओढे, नाले खळाळू लागले आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच सरासरी दोनशे मिलिमीटर पाऊस माण तालुक्यात पडला आहे. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस (Mahabaleshwar Rain) माणमध्ये पडला आहे. महाबळेश्वरमध्ये १८६.७ मिलिमीटर पडला आहे. गेल्या कित्येक वर्षात प्रथमच असं घडलं असून, माणमधील पावसाचे प्रमाण हे पहिल्या पंधरवड्यातील सामान्य पावसाच्या ३३२ टक्के इतके आहे.

माण तालुका मागील काही महिन्यांपासून दुष्काळाशी झुंज देत आहे. ऐन उन्हाळ्यात तर भीषण पाणीटंचाईचा सामना करताना सामान्य ग्रामस्थांसह प्रशासन मेटाकुटीस आले होते. टँकरद्वारे मोठ्या लोकसंख्येला, तसेच जनावरांना पाणी पुरवताना अडचणींचा डोंगर उभा राहात होता. सर्व जण वळिवाकडे आस लावून बसले होते; पण एप्रिल व मे महिन्यांत म्हणावा असा वळीव कोसळलाच नाही. त्यामुळे सर्व जण पावसाची चातकासारखी वाट बघत होते.

जून महिन्यात माण तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात होत असते आणि तो सुद्धा पडला तर पडला नाहीतर बहुतांशीवेळा जून पावसाच्या प्रतीक्षेतच जातो. मुसळधार पाऊस अन् तो सुद्धा जून महिन्यात अनेकांनी गेली कित्येक वर्षे पाहिलेला नाही, काहींना तर आठवत सुद्धा नाही. मात्र यंदाचा जून माणसाठी काही वेगळाच आहे. साधारण ५ जूनला पावसाने माण तालुक्यात दमदार आगमन केले. ५ जूनपासून आजपर्यंत अपवाद वगळता दररोज थोडा का होईना पाऊस पडतोय. त्यातही अनेकदा दमदार स्वरूपाचाच पाऊस पडतोय.

सातत्याने पडत असलेल्या या दमदार पावसाने मोकळ्या शेतशिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी साठल्याने ताली फुटल्या आहेत. काही ठिकाणी शेतं वाहून गेली आहेत. ओढ्यानाल्यांना पूर आल्याने सिमेंट बंधारे भरभरून वाहू लागले आहेत, तर पाझर तलावांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. तळ गाठलेल्या विहिरी काठोकाठ भरण्याच्या तयारीत आहेत. या पावसाने शेतकऱ्यासह सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नऊ दिवस जोरदार पाऊस

माणमध्ये १ जून ते १७ जूनपर्यंत सामान्यपणे ५९.६ मिलिमीटर पाऊस पडतो; पण प्रत्यक्षात यंदा या कालावधीत एकूण १७ दिवसांपैकी सरासरी ९ दिवस पाऊस पडला असून, आजपर्यंत १९५.१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा पाऊस सामान्य पावसाच्या ३२७.५% इतका आहे. या उलट महाबळेश्वरमध्ये ५२०.५ मिलिमीटर अपेक्षित असताना फक्त १८६.७ मिलिमीटर पडला असून, टक्केवारी सामान्य पावसाच्या फक्त ३५.९% इतकी आहे.

१ ते १६ जूनपर्यंत पाऊस

मंडल - आजपर्यंत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)- किती दिवस पाऊस पडला

  • दहिवडी १८८.२ ११

  • मलवडी २७८.६ ११

  • गोंदवले बुद्रुक २१३.७ ११

  • कुकुडवाड १३९.५ ६

  • म्हसवड १४६.८ ८

  • मार्डी १९५.३ ११

  • शिंगणापूर २०४.४ १०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - टीआरपी क्वीन निक्की तांबोळी घराबाहेर; निक्कीचा बीबीमराठी ५चा घरातला प्रवास संपला

Viral: 'मला तुरुंगात पाठवा, माझ्याकडे...', व्यापारी GST कार्यालयात गेला, अधिकाऱ्यांसमोरच अर्धनग्न होत छेडलं आंदोलन, कारण काय?

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नराधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT