सातारा : सातारा पालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी दिली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार लोकहिताचे घेत असलेले निर्णय आणि शासनाची प्रगती यावर विश्वास ठेऊन सातारा शहरातील अनेक जण शिवसेनेच्या प्रवाहात सामील होणार आहेत.
नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची एकत्रित बांधणी करून सर्व ताकदीनिशी पालिकेची निवडणूक लढविणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपर्कप्रमुख दिवाकर रावते, पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक दगडूदादा सपकाळ, नितीन बानुगडे-पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली.
खासदार उदयनराजे भाेसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांची पालिकेत वर्चस्व आहे. सातारा शहरातील पालिकेची सत्ता आपल्या ताब्यात असावी यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने यापु्र्वीच पॅनेल टाकण्याचे जाहीर केले आहे. आता शिवसेनेने देखील निवडणुक लढविण्याचे जाहीर केलेने आगामी काळात पक्षीय चूरस दिसेल असे चिन्ह निर्माण झाले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.