satara nagar panchayat election  sakal
सातारा

दहिवडीत सत्तांतर; प्रभाकर देशमुखांचा करिष्मा, आमदार गोरे गटाचा धुव्वा

रुपेश कदम :

दहिवडी : दहिवडी नगरपंचायतीमध्ये प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराच्या साथीने नऊ जागा जिंकत सत्तांतर घडवले. आमदार जयकुमार गटाच्या फक्त पाच जागा निवडून आल्याने आमदार गोरे गटाचा धुव्वा उडाला. एकसंघ व मजबूत प्रचार राष्ट्रवादीला विजयापर्यंत घेवून गेला तर अंतर्गत लाथाळ्या, कुरघोड्या व सत्तेची मस्ती भाजपला नडली. (satara nagar panchayat election)

दहिवडी नगरपंचयतीच्या निवडणुकीमध्ये १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागा मिळवल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजेंद्र साळुंखे हे सर्वाधिक ५०० पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. तर भाजपने पाच जागा तर शिवसेनेने तीन जागा जिंकल्या. भाजपच्या सत्ता काळात जनतेला पाच वर्षे पाणी पुरवठा व्यवस्थित करता आला नाही. आठ दिवसांतून येणारे गढूळ व दूषित पाणी, तुंबलेली गटारे याने जनता त्रस्त झाली होती. नळ कनेक्शन, घरांची नोंदणी असो की बांधकाम परवाना घेताना ही जनतेला प्रचंड त्रास देण्यात आला. भ्रष्टाचाराने बरबटलेले सत्ता जनतेने अखेर उलथवून टाकली. सत्तेची धुंदी, अरेरावी, आडवाआडवी याला जनता त्रासली होती. त्याचा परिणाम जनतेने मतदानातून दाखवला. मतदारांना गृहीत धरणे नसल्यामुळेच फक्त पाच जागांवर भाजपला समाधान मानावे लागले.

तर दुसरीकडे प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजनबद्ध प्रचार करुन न येणाऱ्या जागाही मोठ्या फरकाने निवडून आणून चमत्कार केला. आठ उमेदवार विजयी करण्यात राष्ट्रवादीला यश आले. जेष्ठ व तरुण एकत्र आल्यास काय घडू शकते याचा प्रत्यय राष्ट्रवादीच्या विजयात आला. तर शेखर गोरे यांनीही ऐनवेळी निवडणुकीत येऊन रंगत आणली व शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी केले. प्रभाग पाचमधील शैलेंद्र खरात यांचा विजय सिध्दार्थ गुंडगे आणि अजित पवार यांचा पराभव धक्कादायक ठरला. या सत्तांतराने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचे वातावरण असून शहरातून गुलालाची उधळण करत जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली.

नगरपंचायतीचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे

  • प्रभाग १ - सुरेखा पखाले शिवसेना

  • प्रभाग २ - वर्षांराणी सावंत राष्ट्रवादी

  • प्रभाग ३ - विजया जाधव शिवसेना

  • प्रभाग ४ - महेश जाधव राष्ट्रवादी

  • प्रभाग ५ - शैलेंद्र खरात शिवसेना

  • प्रभाग ६ - धनाजी जाधव भाजप

  • प्रभाग ७ - उज्वला पवार भाजप

  • प्रभाग ८ - मोनिका गुंडगे राष्ट्रवादी

  • प्रभाग ९ - नीलम जाधव भाजप

  • प्रभाग १० - नीलिमा पोळ राष्ट्रवादी

  • प्रभाग ११ - राणी अवघडे भाजप

  • प्रभाग १२ - राजेंद्र साळूंखे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष

  • प्रभाग १३ - विशाल पोळ राष्ट्रवादी

  • प्रभाग १४ - सागर पोळ राष्ट्रवादी

  • प्रभाग १५ - रुपेश मोरे भाजप प्रभाग १६ सुरेंद्र मोरे राष्ट्रवादी

  • प्रभाग १७ - सुप्रिया जाधव राष्ट्रवादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

SCROLL FOR NEXT