शिवथर (जि. सातारा) : कडधान्य, फळे, दूध, अंडी, भाजीपाला, मांस, मासे, गुळ, शेंगदाणे, लिंबू, बीट, काकडी असा आहार गरोदर मातांनी घ्यावा तरच बाळाची योग्य प्रकारे वाढ होईल, तसेच कोरोना काळामध्ये गरोदर मातांनी योग्य प्रकारे काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन येथील ग्रामपंचायतीच्या निर्वाचित सरपंच रूपाली साबळे यांनी केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक गावामधील ग्रामपंचायतीअंतर्गत असणाऱ्या अंगणवाड्यांत गरोदर मातांना तिसऱ्या व चौथ्या महिन्यामध्ये मार्गदर्शन आणि आहार नियोजन मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबिराचे औचित्य साधून येथील अंगणवाडी क्रमांक 220 मध्ये ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य, सरपंच व उपसरपंचांचा सत्कार व गरोदर मातांनी आहार कसा घ्यावा, याबाबत सरपंच साबळे बोलत होत्या. आदर्श संसद गावामध्ये नवीन उपक्रम राबवणे हा शिवथरचा वेगळा पायंडा आहे. कोरोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि घरातील वृद्ध लोकांची योग्य प्रकारे काळजी घेतली तरच आपण या संकटावर मात करू शकू, असेही सरपंच साबळे म्हणाल्या.
अंगणवाडी सेविका संगीता रांजणे यांनीही गरोदर मातांनी घ्यावयाच्या आहाराबाबत मार्गदर्शन केले. शिवथर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील साबळे, सदस्य दत्तात्रय साबळे, महेश साबळे, प्रिया साबळे, हेमलता साबळे, सुप्रिया माने तसेच संगीता देठे, अंजुम इनामदार, नीता पवार, शबनम मुलाणी, अर्चना साबळे, समीना भालदार, गरोदर माता उपस्थित होत्या. उपसरपंच साबळे यांनी आभार मानले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.