बिजवडी - माण-खटाव तालुक्यासाठी वरदायी ठरणाऱ्या जिहे-कठापूर आणि टेंभू उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचे फेरवाटप करण्याचा प्रस्ताव मार्गी लागला आहे. टेंभू योजनेतून ४४ गावांसाठी अडीच टीएमसी, तर जिहे-कठापूरमधून १.१ टीएमसी जादा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खटाव तालुक्यातील वेटणे आणि रणसिंगवाडी या दोन गावांना जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे ०.१३ टीएमसी पाणी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याचा दुष्काळी तालुक्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
खटाव तालुक्यातील वेटणे आणि रणसिंगवाडी या दोन गावांना जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे ०.१३ टीएमसी पाणी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याचा दुष्काळी तालुक्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी नेर धरणातून माण तालुक्यातील आंधळी धरणात नेण्यासाठी वेटणेपासून बोगदा खोदण्यात आला आहे. या बोगद्यामुळे वेटणे आणि रणसिंगवाडी परिसरातील विहिरी, तलाव आणि इतर जलस्त्रोतांचे पाणी आटले आहे. या भागात भीषण टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी आणि नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. बोगद्यातून माण तालुक्यात पाणी नेताना ०.१३ टीएमसी पाणी या दोन गावांसाठी मिळावे, अशी मागणी होती.
दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने करून हक्काच्या पाण्यासाठी टाहो फोडला होता. आताही आरपारची लढाई लढताना वेटणे आणि रणसिंगवाडीकरांनी उपोषण सुरू केले होते. पाणी फेरवाटपाच्या प्रस्तावासाठी मंगळवारी मंत्रालयात प्रधान सचिवांसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक होऊन प्रस्ताव उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला होता. टेंभू योजनेतून अडीच टीएमसी पाण्याची मागणीही त्यांनी केली होती.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाणी फेरवाटप प्रस्तावावर सही केल्याने आपल्या दोन्ही मागण्या मार्गी लागल्या आहेत.
उत्तर माणमधील बिजवडी, मोगराळे, शिंगणापूर, मोही, परखंदी, थदाळे, तोंडलेसह माण तालुक्यातील १८ गावांना जिहे-कठापूर योजनेचे पाणी आरक्षित झाल्याने या भागाचाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.