बुध (जि. सातारा) : पुरस्कार आपली जबाबदारी वाढवतात. मग तो कार्याचा असो किंवा विचारांचा. आपली मूल्य हिच आपली ओळख असते. नीतिमूल्यांमुळेच समाजात माणुसकीचा झरा निर्माण होईल, असा आशावाद परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक किशोर काळोखे यांनी व्यक्त केला.
महात्मा गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून गांधीग्राम (राजापूर, ता. खटाव) येथे काटेवाडी येथील सर्वोदय सामाजिक संस्थेच्या वतीने पद्भूषण डॉ. पा. वा. सुखात्मे समाजभूषण पुरस्कार जयसिंगपूर (ता. शिराळा) येथील भास्करराव शिंदे यांना श्री. काळोखे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी स्वराज कन्स्ट्रक्शनचे मंगेश नलवडे, आण्णा जाधव, माणीक शेडगे, हिंदुस्थान ऑरगॅनिक्सचे जनरल मॅनेजर एम. एन. घनवट यांची उपस्थिती होती.
श्री. काळोखे म्हणाले, ""आयुष्यभर विविध विचार करत बसण्यापेक्षा एक विवेकी विचार आयुष्यभर जगता आला पाहिजे. महात्मा गांधी व डॉ. सुखात्मे यांनी सामान्य व गरीब लोकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी, सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी काम केले.'' संस्थेचे अध्यक्ष जीवन सर्वोदयी यांनी संस्थेच्या वर्षभर सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद केले. या वेळी "गांधी समजून घेताना' या विषयावर माणिक शेडगे यांचे व्याख्यान झाले. मुख्याध्यापिका हेमलता फडतरे यांनी मुलांच्या संस्कार शिबिराबाबत माहिती दिली. नीलिमा मोहिते यांनी या वेळी समाजप्रबोधनपर कविता सादर केली. प्रा. आरती माळी यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब इनामदार यांनी आभार मानले.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.