मल्हारपेठ (जि. सातारा) : कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या लाभार्थींच्या अनुदानाचा धनदांडग्यांच्याकडूनच वापर होताना दिसत आहे. त्यामध्ये नोंदणी करण्यासाठी दलालांचा सुळसुळाट सुरू असून नोंदणीसाठी हजार, दोन हजारांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामध्ये अनेक कामगारबाह्य नागरिकांच्या समावेशामुळे खरे लाभार्थी लाभांपासून वंचित राहिल्याची स्थिती पाटण तालुक्यातील आहे.
संबंधितांनी लाभ घेतलेल्या लाभार्थींची तपासणी करून बोगस नोंदणी रद्द करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांतून होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याणकारी योजनेमध्ये प्रत्येक तालुक्यात नोंदणी करताना बोगस नोंदणी करून लाभ घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेत ज्या कामगाराचा समावेश होतो, त्यास कामासाठी लागणारी उपकरणे मोफत दिली जात आहेत, तर कुटुंबासाठी भरीव अर्थसाह्य दिले जाते. योजनेत खोदाई कामगार, सेंट्रिंग कामगार, गवंडी कारागीर, फरशी फिटिंग, पेंटिंग कारागीर, फर्निचर कामगार, फॅब्रिकेटर्स कामगार, इमारतीच्या खोदाई कामापासून ते इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे कामगार काम करतात, त्यांची नोंदणी केली जाते.
पाटण तालुक्यातील नोंदणी झालेल्या कामगारांपैकी किती कामगार आज कार्यरत आहेत, याची माहिती संकलित करून बोगस नोंदणी करून आर्थिक लाभ घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी अनेक वंचित कामगारांतून होऊ लागली आहे. गावोगावी योजनेत समाविष्ट करण्यासाठी विभागनिहाय दलाल तयार झाले आहेत. कामगार मंडळाचे नियम धाब्यावर बसवून हे दलाल नागरिकांच्या नोंदी करत आहेत. त्यातून नोंदणीपोटी 1,200 ते 1,500 रुपये घेत असून त्यांची खातेनिहाय चौकशी करून बोगसगिरीचा भांडाफोड करण्याची मागणी होऊ लागली आहे.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.