सातारा : सातारा जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळ (tourist places) आजपासून (साेमवार) खूली झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर प्रशासनासह स्थानिकांनी काेविड 19 चे नियम पाळले जातील यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. महाबळेश्वर-पाचगणीत (mahableshwar) पावसाळी पर्यटनासाठी हाेणारी गर्दी लक्षात घेऊन तूर्तास प्रशासनाने केवळ बाजारपेठ, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट खूली केली आहेत. या थंड हवेच्या ठिकाणी असणारे पाॅईंटस बंद राहणार आहेत. येत्या आठवड्यात काेविड 19 रुगणांची संख्या आणि एकंदरीत परिस्थिती पाहून पाॅईंटस खूले जातील असे प्रांताधिकारी संगीता राजापुरकर (sangita rajapurkar) यांनी ई-सकाळशी बाेलतना दिली. (satara-news-mahabaleshwar-panchgani-reopen-for-tourists-viewing-points-to-remain-close)
शासनाच्या निकषानुसार सातारा जिल्हा हा तिसऱ्या स्तरावर समाविष्ट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउनच्या नियमात शिथिलता जाहीर केली आहे. यानुसार महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी आजपासून (साेमवार) खुली करण्यात आली आहेत. आज सकाऴपासून महाबळेश्वरात पर्यटक दाखल हाेत हाेते. दहा वाजेपर्यंत येथील बाजारपेठ हळूहळू खूली हाेत हाेती. दरम्यान गेल्या आठवड्यातच बाजारपेठेतील दुकानदार व दुकानातील नोकर यांची पालिकेने त्यांच्या दारी जावून कोविडची रॅपिड टेस्ट केल्या हाेत्या. सर्वच सर्व 123 जणांची टेस्ट निगेटिव्ह आल्या हाेत्या. त्यामुळे आज (साेमवार) संपुर्ण बाजारपेठ खूली हाेईल अशी चिन्ह आहेत.
महाबळेश्वर व पाचगणी पर्यटनस्थळ खूले झाले असले तरी येथे येणा-या पर्यटकांची बुकिंगच्या वेळी हॉटेल, तसेच खासगी बंगल्यामध्ये राहणा-यांची आरटीपीसीआर किंवा रॅट टेस्ट केलेली निगेटिव्ह चाचणी ही ७२ तासांपूर्वी केलेली असणे बंधनकारक करण्यात आले आहे. निगेटिव्ह चाचणी अहवालावर आयसीएमआर नंबर असणे बंधनकारक राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.
रेस्टॉरंट, खासगी बंगलोज, हॉटेल्स व रिसॉर्टसचे मालक यांनी पर्यटकांना प्रवेश देताना पर्यटकांचे थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिजन लेव्हल तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले असून, अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ अथवा विरोध केल्यास अशांवर कारवाई संबंधित पोलिसांनी करावी, असे सांगितले आहे.
महाबळेश्वर व पाचगणीमधील हॉटेल व खासगी बंगले आदींचे चालक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी येत्या तीस दिवसांत लसीकरण करावे. दर दहा दिवसांनंतर सर्व हॉटेल व खासगी बंगले आदींचे चालक व कर्मचारी यांनी रॅपिड अथवा आरटीपीसीआर चाचणी करावी असेही सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान येत्या आठ दिवसांत पर्यटनस्थळावरील विविध पाॅईंटस खूले जातील असे प्रांताधिका-यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाबळेश्वरजवळील धबधबे, निसर्गरम्य पाॅॅईंटस पर्यटकांना पाहण्यासाठी पुढचा साेमवारची (ता.28) वाट पहावी लागणार असे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.