सातारा : सातारा नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीचा मार्ग मोकळा झाला असून तशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने सातारा नगरपालिकेस आज पत्राव्दारे केल्या आहेत. या पत्रानुसार निवडीचा कार्यक्रम नगराध्यक्षा माधवी कदम आठवडाभरात जाहीर करण्याची शक्यता असून पुन्हा एकदा साविआतील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
सातारा नगरपालिकेत संख्याबळानुसार सातारा विकास आघाडीचे दोन, नविआ आणि भाजपाचे प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक आहे. यापैकी साविआचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत आहेरराव यांनी खा. उदयनराजे यांच्या आदेशानुसार राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर नवीन निवडीसाठीच्या हालचाली साविआत सुरु झाल्या होत्या. स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेक इच्छुकांनी उदयनराजेंना साकडे घातले होते. निवडीच्या चर्चा वेगात असतानाच पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. या निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्याने स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम रेंगाळला.
निवडणूका पार पडल्याने स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने आज पत्राव्दारे सातारा नगरपालिकेस केल्या. या पत्रानुसार स्वीकृत निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. निवडीचा कार्यक्रम डिसेंबर महिन्यातील 24, 28 किंवा 29 तारखेला पार पडेल अशी शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी वर्तविला. या पत्रानुसार येत्या आठवड्यात नगराध्यक्षा माधवी कदम यांना निवडीचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.