कोरेगाव (जि. सातारा) : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे (maharashtra state warehousing corporation) अधिकारी आणि कर्मचारी हे विविध मागण्यांसाठी बुधवारपासून (ता. १६) बेमुदत संपावर (stirke) जाणार असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील आठ शाखांमधून (गोदामे) शासकीय धान्य, शेतकरी-व्यापारी शेतमाल, दूध पावडर, बी-बियाणे, खते आदी वितरण व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे. या आठ शाखांमध्ये आज सुमारे एक लाख ४५ हजार ६३५ मेट्रिक टन मालाची साठवणूक आहे. (satara-news-officers-and-staff-maharashtra-state-warehousing-corporation-on-strike)
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, मार्केटिंग फेडरेशन, वनविकास महामंडळ आणि पश्चिम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एकत्रित कृती समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून बुधवारपासून राज्यस्तरावर बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या सातारा ‘ड’- पाच, सातारा ‘क’- चार, जळगाव (सातारा), कोरेगाव, वाई, कऱ्हाड, फलटण, लोणंद अशा आठ (गोदामे) शाखांतील १८ अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारीही बेमुदत संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे.
वखार महामंडळ हे शासकीय धान्य वितरण व्यवस्थेतील मुख्य घटक असून, तांदूळ व गहू साठा साठवून, त्याची जिल्हा वितरण व्यवस्थेतमार्फत रेशनकार्डवर धान्य वितरित होते. शेतकऱ्यांचे शासकीय हमीभावाने खरेदी केलेले धान्य, कडधान्य व गळीतधान्य साठवणूक करून वितरण व्यवस्था केली जाते. तसेच शेतकऱ्यांच्या इतर धान्याची साठवणूक व वितरण व्यवस्था होते. दूध पावडरची साठवणूक व वितरण व्यवस्थाही होते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत खरेदी होणारे धान्य साठवणूक व वितरण व्यवस्थाही होते. मात्र, या बेमुदत संपामुळे वखार महामंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या या सेवा ठप्प होणार असल्यामुळे शासकीय, शेतकरी, दूध उत्पादक व प्रक्रिया उद्योग ठप्प होऊन मोठे नुकसान होऊ शकते. त्यास पूर्णतः राज्य शासन जबाबदार राहील, असा इशारा वखार महामंडळातील कर्मचाऱ्यांनी दिला.
काळ्या फिती लावून द्वारसभा
दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर वखार महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ नुकत्याच काळ्या फिती लावून द्वारसभा घेतल्या. त्यात कोल्हापूर विभागाचे उपाध्यक्ष व फलटणचे साठा अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सातारा ‘क’- चार व पाचचे साठा अधीक्षक जे. बी. पाखरे, आर. ए. गलांडे, जळगावचे (सातारा) साठा अधीक्षक जी. ए. सुपेकर सहभागी झाले होते.
महाबळेश्वरात पर्यटकांचा लाेंढा; प्रशासनाचा ‘मॅप्रो’स दणका
जिल्ह्यातील गोदामांतील शिल्लक माल (मेट्रिक टनांमध्ये)
सातारा ‘क’ चार : २२,८०० (शासकीय गहू, तांदूळ व शेतकरी-व्यापारी शेतमाल)
सातारा ‘ड’ पाच : ७,८१० (रासायनिक खते, शेतकरी-व्यापारी शेतमाल)
जळगाव (सातारा) : १३,८६० (शासकीय गहू व तांदूळ)
कऱ्हाड : १२,०४५ (रासायनिक खते, शेतकरी-व्यापारी शेतमाल)
कोरेगाव : २,१६० (शेतकरी-व्यापारी शेतमाल)
वाई : ७,६०० (शेतकरी-व्यापारी शेतमाल)
लोणंद : २०,४४० (शासकीय गहू, तांदूळ व शेतकरी-व्यापारी शेतमाल)
फलटण : ८,९२० (शेतकरी-व्यापारी शेतमाल व गोविंद दूध पावडर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.