Satara Latest Marathi News 
सातारा

कृष्णा खोऱ्याला जागा देण्यास क्षेत्रमाहुलीचा विरोध; 'मेडिकल कॉलेज'चा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर!

उमेश बांबरे

सातारा : शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न पुन्हा निर्माण झाला आहे. कृष्णा खोऱ्याच्या जागेच्या बदल्यात क्षेत्रमाहुली येथील जागा देण्यास ग्रामपंचायतीने विरोध केला आहे. जागा हवी असल्यास येथेच मेडिकल कॉलेज उभारा, आम्ही कृष्णा खोऱ्याला जागा देणार नाही, अशी भूमिका ग्रामपंचायतीने घेतली आहे. त्यामुळे क्षेत्रमाहुली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान जमीन कृष्णा खोऱ्यास न दिल्यास मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यातून कोणता मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

साताऱ्यातील शासकीय मेडिकल कॉलेजसाठी कृष्णा खोऱ्याची जागा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी 60 एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झाली आहे; पण या जागेच्या बदल्यात कृष्णा खोऱ्याला तेवढीच जागा द्यावी, अशी अट घालण्यात आली आहे. सध्या इतक्‍या मोठ्या प्रमाणात जागा क्षेत्रमाहुली ग्रामपंचायतीकडे गायरान म्हणून शिल्लक आहे. ही जागा कृष्णा खोऱ्याला द्यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. मात्र, क्षेत्रमाहुली ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन आम्ही कृष्णा खोऱ्याला ही जागा देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. क्षेत्रमाहुली येथे मेडिकल कॉलेज होणार असेल, तरच आमची जागा देण्यास हरकत नसेल. कोणत्या परिस्थितीत कृष्णा खोऱ्याला जागा देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत हा विषय ऐनवेळच्या चर्चेत ऐरणीवर आला आहे. 

सातारा येथील मेडिकल कॉलेज कृष्णा खोरेच्या कृष्णानगर येथील जागेत होणार असल्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मेडिकल कॉलेजला 60 एकर जागा लागणार (24 हेक्‍टर) आहे. जेवढी जागा मेडिकल कॉलेजला दिली तेवढीच जागा कृष्णा खोऱ्याला हवी असून, ही जागा सातारा तालुक्‍यातच हवी आहे, असे कृष्णा खोऱ्याने स्पष्ट केले आहे. याबाबतचा प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठविला आहे. आता जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असल्याने त्यांनी जागेचा शोध सुरू केला होता. त्यानुसार क्षेत्रमाहुली येथील गायरान जागा शिल्लक असल्याचे समोर आले. 

क्षेत्रमाहुली ग्रामपंचायतीकडे एकूण 98.57 हेक्‍टर गायरान क्षेत्र आहे. त्यापैकी त्यांनी विविध सरकारी उपक्रमाला जागा देऊन 76.48 हेक्‍टर जागा शिल्लक आहे. सातारा मेडिकल कॉलेजला 24.43 हेक्‍टर (60 एकर) जागा कृष्णा खोऱ्याने दिली आहे. मात्र, त्याबदल्यात तेवढीच आणि अगदी सातारा शहराजवळची जागा कृष्णा खोऱ्यास हवी आहे. यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तोडगा काढत क्षेत्रमाहुली येथील जागा कृष्णा खोरेला सुचविली आहे. क्षेत्रमाहुली येथील जागा कृष्णा खोरेला देण्याबाबत विचार सुरू झाल्याचे लक्षात आल्यानंतर येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत विशेष ठराव घेत ही जागा कृष्णा खोरेला देण्यास नकार दिला आहे. 

जिल्हा परिषदेच्या जागेवर डोळा 

कृष्णा खोरे विकास महामंडळाला मेडिकल कॉलेजला दिलेल्या जागेच्या बदल्यात तेवढीच; पण सातारा तालुक्‍यातील जागा हवी आहे. तसा त्यांचा प्रतापसिंह शेती उद्यानाच्या जागेवर डोळा आहे. ही जागा जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ताब्यातील मोक्‍याची जागा कृष्णा खोऱ्याला देण्यास जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी मान्यता देणार का, हा प्रश्‍न आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाही प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT