Illegal-Hoarding sakal
सातारा

Satara News : नागरिकांचा जीव महत्त्वाचा की बॅनर?

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरातून कोल्हापूर, कऱ्हाड या भागात जाणाऱ्या एसटी व खासगी वाहने पोवई नाका, गोडोली व शिवराज चौक मार्गाने जातात. या रस्त्यावर नुकतेच रुंदीकरण व डांबरीकरण केले आहे.

मात्र, या मार्गावरील वन विभागाजवळील फॉरेस्ट कॉलनी येथे तीव्र वळणावर झाडेझुडपे उगवली असून, वाढदिवसाचे फलक लावले जातात.

या प्रकारामुळे रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना समोरील वाहन दिसत नसल्याने हे वळण धोकादायक बनले आहे.

त्यामुळे नागरिकांचा जीव महत्त्वाचा की वाढदिवसाचे बॅनर? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

गोडोली चौक ते शिवराज चौकापर्यंत असणारा मार्ग सुस्थितीत असणे आवश्‍यक होते. मात्र, मागील कित्येक वर्षांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष होते.

अनेक ठिकाणी खड्डे, साइडपट्ट्या खचलेल्या अशा परिस्थितीत वाहने मार्गक्रमण करत होती. या मार्गावर अनेकदा अपघाताचे प्रकार घडून गंभीर घटना घडल्या होत्या. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करून नव्याने डांबरीकरण करणे आवश्‍यक होते.

त्यादृष्टीने प्रशासनाने रस्त्याचे डांबरीकरण केल्याने वाहने सुसाट जात आहेत. या ठिकाणी वन विभागाजवळील फॉरेस्ट कॉलनी येथे तीव्र वळण असून, ओढ्यालगत मोठ्या प्रमाणात झाडे उगवून आली आहेत.

अनधिकृत फलकही लावले जात असल्याने रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी हे वळण धोकादायक बनत आहे.

स्थानिक लोकनेत्यांनी लक्ष घालावे

गोडोली ते शिवराज चौकदरम्यान असणाऱ्या फॉरेस्ट कॉलनीच्या सुरुवातीला ओढ्यालगत झाडे वाढली आहेत. या ठिकाणी वारंवार वाढदिवस व इतर कार्यक्रमांचे बॅनर लावले जातात.

याआधी तीव्र वळण नव्हते तसेच रस्ताही खराब होता, त्यामुळे समोरून येणारे वाहने दिसत होती. मात्र, आता नव्याने डांबरीकरण केल्याने वळण तीव्र झाले आहे.

त्यामुळे रस्ता ओलांडताना वाहनच दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. हा प्रकार रोखण्यासाठी स्थानिक लोकनेत्यांनी लक्ष घालणे आवश्‍यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT