सातारा

आदर्शवत! आईची स्मृती जपण्यासाठी रक्षा विखुरल्या शेतात; साताऱ्यातील मेढ्यात पर्यावरण रक्षणासाठी अनोखे पाऊल

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : आंबेघर तर्फ मेढा येथील शेलार कुटुंबाने आपल्या आईच्या निधनानंतर तिचे रक्षा विसर्जन नदीत न करता ती रक्षा आपल्या शेतीत झाडाजवळ पसरून एक अनोखा पायंडा पाडला आहे. शेलार कुटुंबीयांनी अनोख्या पद्धतीने आपल्या आईची स्मृती कायमस्वरूपी जपण्याचा एक स्तुत्य उपक्रम यानिमित्ताने राबवला असून, या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

शांताबाई शेलार यांचे नुकतेच निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट करून आपला मुलगा येथील डॉ. सुरेश शेलार, सांगलीतील वैज्ञानिक शंकर शेलार व शेतकरी रमेश शेलार यांना उच्च शिक्षण दिले. आपल्या आईने आपल्यासाठी खूप काबाडकष्ट केल्याची जाणीव ठेऊन आईची स्मृती चिरकाल टिकून राहण्यासाठी आईच्या अंत्यसंस्कार झाल्यावर रक्षा नदीत विसर्जन न करता शेलार बंधूंनी आपल्या शेतात ही रक्षा पसरली, तसेच झाडांच्या बुंध्याजवळ ही रक्षा पसरण्यात आली. रक्षा विसर्जन करताना ही रक्षा बहुतांश ठिकाणी नदीत सोडली जाते. त्यामुळे प्रदूषण होते. लोकांना त्रास सहन करावा लागतो म्हणून व शेलार बंधूंनी आपल्या आईच्या रक्षेचे विसर्जन नदीत न करता आपल्या शेतीत करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवलेला आहे. 

दरम्यान, शुद्ध, पवित्र नद्या-संगमांचे जल प्रदूषित होऊ नये म्हणून आम्ही आमच्या आईच्या अस्थी व रक्षा शेतात विसर्जित करून आमचे क्षेत्र पावन केले आणि आईला आम्रवृक्षांच्या रूपात अमर केले. माळावर नंदनवन फुलविणाऱ्या माझ्या आईचे आज खऱ्या अर्थाने सोने झाले. इतरांनीही रक्षा नदीत धुवून न घालवता ती शेतात विसर्जित करावी, असे आवाहन वैद्यानिक श्री. शेलार यांनी व्यक्त केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT