सातारा

साताऱ्यातील 'शिल्पसृष्टी'स शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे समर्थन; पुरोगामी संघटनांचा आक्षेप

गिरीश चव्हाण

सातारा : येथील राजवाडा बस स्थानकात उभारण्यात आलेल्या शिल्पसृष्टीवरून वाद निर्माण होत चालला आहेत. हे वाद निर्माण होत असतानाच शिल्पसृष्टीच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मैदानात उतरली आहे. याबाबतचे निवेदन प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवक विजय काटवटे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले. निवेदनासोबत पुराव्यादाखल महाराष्ट्र राज्य गॅझेटियरच्या "सातारा जिल्हा' या खंडातील पानांच्या प्रती जोडण्यात आल्या आहेत. 

हिंदुत्वनिष्ठ संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर, पक्ष आणि संप्रदायाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. या वेळी शहाजीबुवा रामदासी, नगरसेवक प्राची शहाणे, प्रकाश शहाणे, शुभम शिंदे, ऋषिकेश कणसे, चंदन डोंगरे, तेजस ढाणे, अजिंक्‍य गुजर, तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि धारकरी उपस्थित होते. निवेदनातील माहिती अशी, सातारा ही ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीस छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींचा पदस्पर्श झाला आहे. या ऐतिहासिक भूमीतील राजवाडा बस स्थानकात शासनाच्या वतीने "शिवसमर्थ'चे शिल्प उभारण्यात आले आहे. हे शिल्प गुरू-शिष्य परंपरेची महती सांगणारे आहे. 

संपूर्ण जगात, देशात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे नाव आदराने गुरुशिष्य परंपरेत घेतले जाते. याबाबतचे ऐतिहासिक दस्तऐवज पुरातत्व खात्याकडे, तसेच धुळे येथील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध आहेत. या पुराव्यांकडे दुर्लक्ष करत पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांनी विनाकारण शिल्पावर आक्षेप घेतला आहे, तसेच काही जण शिल्प हटविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणत असून, त्या प्रवृत्तींचा निषेध करत आहेत. निवेदन देण्यापूर्वी शहाजीबुवा रामदासी व इतरांनी समर्थनाच्या बाबतीतील भूमिका मांडली. नगरसेवक काटवटे यांनीही हा वाद चुकीचा असून, शिल्पाच्या बाजूने शिवप्रेमी, धर्मप्रेमींनी समर्थन दिल्याचे सांगत शंका असणाऱ्यांनी पुराव्यानिशी चर्चेला येण्याचे आव्हान दिले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT