Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

प्राथमिक शिक्षकांच्या त्वरित समस्या सोडवू; गटशिक्षणाधिकाऱ्यांचे शिक्षक मंडळाला आश्वासन

रूपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : प्राथमिक शिक्षक संघाने माण तालुक्‍यातील शिक्षकांच्या मांडलेल्या विविध समस्या सोडविण्याची ग्वाही गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते यांनी माण तालुका शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या शिक्षकांच्या मागण्यांच्या निवेदनावर बोलताना दिली. 

वरिष्ठ वेतनश्रेणी व वैद्यकीय बिले मंजूर असून, ती संबंधित शिक्षकास तत्काळ मिळावीत. वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासाठी असणारी प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राची अट रद्द करावी. हिंदी भाषा सूट व स्थायित्व प्रमाणपत्राचे राहिलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव मागवून ते मंजूर करावेत. गोपनीय अहवालाची झेरॉक्‍स प्रत संबंधित शिक्षकास मिळावी. कोरोना प्रतिबंधक लस शिक्षकांना लवकर उपलब्ध करावी. नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेस मार्गदर्शन केलेल्या यशस्वी शिक्षकांचा सन्मान करावा. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्या शिक्षकांनी काम केले, त्यांना निवडणूक भत्ता मिळणेसाठी पाठपुरावा करावा. गटविमा व निवृत्त शिक्षकांचे सुधारित पेन्शन प्रस्तावातील त्रुटी दूर कराव्यात अशा अनेक प्रश्नांबाबत प्राथमिक शिक्षक बॅंकेचे उपाध्यक्ष तथा शिक्षक संघाचे अध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी यावेळी आवाज उठवला. 

या वेळी विभागीय कार्याध्यक्ष मोहनराव जाधव, सरचिटणीस सूरज तुपे, कार्याध्यक्ष महेश माने, वर्षा देवकर, पुंडलिक खराडे, अंजली कट्टे, बळीराम वीरकर, नथुराम जाधव, शिवाजीराव शिंगाडे, दत्तात्रय वाघमारे, दत्ता खाडे, विश्वास अर्जुन, महेश कुचेकर, दत्तात्रय कोळी, गणेश खंदारे, शशिकांत खाडे, महेश कुचेकर, राजाराम साठे, अजित गलांडे, दत्तात्रय कोळी, सचिन वीरकर, शहाजी जाधव, दत्तकुमार खाडे, नागनाथ कदम यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रामभाऊ खाडे यांनी प्रास्ताविक केले. महेश माने यांनी आभार मानले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ती भिंत तोडणारच.. ५०% आरक्षणावरुन राहुल गांधींचा घणाघात, सविधान सन्मान संमेलनात केला हल्लाबोल

Ranji Trophy 2024: ६०००+ धावा अन् ४००+ विकेट्स; असा पराक्रम करणारा पहिला भारतीय, पण टीम इंडियात संधी नाही

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, आता भारतीय इंजिनीअर्सच्या नोकऱ्या जाणार का?

Rahul Gandhi: संविधान नसतं तर..? राहुल गांधींनी फुले आंबेडकरांची आठवण काढत केली RSS वर टीका

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

SCROLL FOR NEXT