राजाचे कुर्ले - पुसेसावळी दंगल घटनेप्रकरणी निष्पाप लोकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे, गावात सर्व जातिधर्माचे लोक राहत असून, सर्वांनी एकोपा ठेवावा. कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पुसेसावळी (ता. खटाव) येथे दंगलीतील मृत नूरहसन शिकलगार यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट, जखमींची विचारपूस व गावातील प्रमुख व्यक्तींच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख बापू बांगर, सुरेश बापू पाटील, दत्तात्रय रुद्रुके, सरपंच सुरेखा माळवे व दोन्ही समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘या दंगलप्रकरणी स्वतः जातीने लक्ष घातले असून, याप्रकरणी संविधानानुसार कायद्याप्रमाणे कारवाई होईल. जातीय सलोखा ठेवण्याकरिता व गावातील वातावरण चांगले ठेवण्याकरिता सर्वांनी एकमेकांना आधार द्यावा. दंगलीसारखी घटना कोणालाही परवडणारी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करून कारभार केला. त्याप्रमाणे आपण पुढे गेले पाहिजे. त्यामुळे सर्वांनी एकमेकांना न घाबरता मदत करावी. कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम पोलिस प्रशासन करीत असून, त्यांना सहकार्य करा.’’ यावेळी नंदकुमार मोरे, सुरेंद्र गुदगे, प्रदीप विधाते, वरिष्ठ शासकीय अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.