Satara Latest Marathi News 
सातारा

Honeymoon ला न जाता बायकोला अभ्यास करायला लावला अन् बायको PSI होताच नवऱ्यानं कडक 'सॅल्यूट' ठोकला

Balkrishna Madhale

सातारा : लग्न हे एक असं नातं आहे जे खूपच समजुतदारपणे आणि कर्तव्यनिष्टतेने निभवावे लागते. कधी-कधी या नात्याची दोर मध्येच छाटली जाते, तर कधी-कधी आपण स्वप्नातही विचार केला नसेल असे काही बदल आपल्याला या नात्यात पहायला मिळतात. लग्नाआधी जोडप्यात फक्त प्रेम पूर्णत्वास नेण्याची, आपलं प्रेम सर्वश्रेष्ठ आहे हे जोडीदाराला पटवून देण्याचीच जबाबदारी असते. पण, लग्न झाल्यानंतर खूप गोष्टी हळूहळू बदलू लागतात आणि त्या नात्याची व्याख्याही त्यासोबत बदलते. 

जसं की कुटुंबीयांची जबाबदारी, प्रेमाच्या नात्यात खरं उतरण्याची इच्छा, आर्थिक ताळमेळ, संसारातील कर्तव्ये, करिअर हे सारं काही एकसाथ सांभाळणं म्हणजे जणू काही तारेवरची कसरतच असते. मात्र, या सगळ्याला अपवाद ठरले आहेत साताऱ्याचे जयदीप पिसाळ. जयदीप पिसाळ यांची प्रेमाची गोष्ट वाचून तुम्हीही त्यांना सॅल्यूट ठोकाल. जयदीप पिसाळ हे लहानपणीपासूनच कष्टाळू होते. त्यांनी पुढं चांगलं शिक्षण घेतलं. जयदीप यांनी वेळप्रसंगी वाठार स्टेशनला उसाचा रस देखील विकला. वाठारला ३ मिनिटे रेल्वे थांबायची याच ३ मिनिटात ते १०-१२ ग्लास रस विकून काही रुपये जमा करायचे व तेच पैसे पुढे शिक्षणासाठी वापरायचे. त्यांनी खूप मेहनत घेऊन एमपीएससीची तयारी केली आणि एकदा नाही, तर २ वेळा या परीक्षेत यश मिळवले. एकदा पीएसआय आणि एकदा दुसरी पोस्ट त्यांना मिळाली होती. पण, त्यांच्या मनात वेगळंच होतं. त्यांना काहीतरी करायचं होतं, म्हणून त्यांनी यासाठी अहोरात्र मेहनत देखील घेतली.  

जयदीपना खऱ्या अर्थाने गावाची सेवा करायची होती. गाव बदलायचं होतं, गावचा विकास साधायचा होता. त्यामुळे त्यांनी कोणतीही नोकरी जॉईन केली नाही. गावाची ओढ असल्याने त्यांनी आपल्या सेवेला प्रारंभ केला. तद्नंतर एमपीएससी पास करून पोस्ट नाकारलेल्या जयदीपणे गावात हिरो होंडाची फ्रॅन्चायजी घेतली. पुढे ते राजकारणात आले आणि पळशी गावचे सरपंच झाले. गावचे सरपंच झाल्याने त्यांना हवातसा गावचा विकास साधणं शक्य होतं, त्यामुळे त्यांनी गावामध्ये विविध योजना आणल्या व गोरगरीबांसाठी ते प्रामाणिक कार्य करत राहिले. त्यांनी अल्पावधीतच गावचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली. गावात अनेक कामं केल्याने त्यांच्या कर्तृत्वाचे अनेकांनी कौतुक देखील केले. गावात सिमेंटचे रस्ते, सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या सोयीसुविधी, पाण्यासाठी विहिरींची खुदाई असे बरेच उपक्रम त्यांनी गावात राबविले. या त्यांच्या कामगिरीची देखल घेऊन शासनाने गावाला विविध पुरस्काराने गौरविले आहे. इथेच न थांबता त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना देखील हाती घेतल्या आहेत. 

इतकं सर्व करुन देखील एवढ्या मोठ्या पोस्ट नाकारल्याने गावातील लोकं त्यांना नावं ठेवू लागली. पण, कधीच ते निराश झाले नाहीत. उलट जोमाने त्यांनी गावाचा विकास साधायचे ध्येय उराशी बाळगून ते पुढे कार्य करत राहिले. गावात तरुण त्याच्याकडे तुच्छतेने बघायला लागले. पण, जयदीपला काही फरक पडला नाही आणि आयुष्यात लढत राहिला. त्याच वेळी त्याचा कल्याणी सकुंडेवर जीव जडला. पण, कल्याणीच्या घरच्यांनी मात्र मुलगी देण्यास नकार दिला. कल्याणीच्या वडिलांनी देखील पोस्ट न स्वीकारल्याने त्याच्यावर टीका केली व आपली मुलगी जयदीपला देण्यास साफ नकार दिला. यातूनही जयदीप हे निराश न होता कल्याणीच्या वडिलांना सांगितले, की २ वर्षात तुमच्या मुलीला पीएसआय करून दाखवतो, असा ठाम आत्मविश्वास दाखवून जयदीपनी कल्याणीला आपलेसे केले. पुढे त्यांचे लग्न झाले. सर्व विधी पार पाडत सत्यनारायणाची पूजा उरकून घेतली. पण, या नवऱ्याने बायकोला हनिमूनला न नेता तिला एक छानसा पंजाबी ड्रेस दिला, पुस्तके दिली आणि एक वेगळी रूम देऊन अभ्यासाला लागण्यास सांगितले. जयदीपच्या या आगळ्या हनिमूनचे कल्याणीच्या वडिलांनी देखील आवर्जुन कौतुक केले व जयदीपच्या पाठीवरती शाब्बासकीची थाप दिली.

गावच्या विकासासोबतच जयदीपणे कल्याणीला अभ्यासाचे धडे दिले. गप्पा न मारता जनरल नॉलेज शिकवत तिच्याकडून अभ्यास परिपूर्ण करुन घेतला व तो क्षण आता जवळ आला होता. जयदीपणे कल्याणीच्या वडिलांना दिलेला 'तो' शब्द आता सत्यात उतरणार होता आणि झालंही तसंच कल्याणी २ वर्षात एमपीएससी पास झाली व तिची ट्रेनिंग सुरु झाली. आजवर आपण नेहमी ऐकत आलो आहोत की, प्रत्येक पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. मात्र, जयदीपणे प्रत्येक स्त्री मागे पुरुषाचा देखील हात असतो, हे त्यांनी कल्याणीच्या बाबतीत करुन दाखवले आहे. कल्याणी सध्या मुंबई पोलिसमध्ये पीएसआय म्हणून कार्यरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT