भिलार (जि.सातारा) : महाबळेश्वर तालुक्यात निसर्ग चक्री वादळाने हाहाकार माजवला असून, जोरदार सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अती दुर्गम, डोंगराळ भागामध्ये महाबळेश्वर तालुका वसला असल्यामुळे पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परवा झालेले वादळ व पावसाची झळ सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसली. पावसाच्या हंगामाच्या प्रारंभीच नागरिकांना नुकसान सोसावे लागले. तालुक्यातील साधारण 150 घरांचे छप्पर उडणे, भिंती पडणे, घर पडणे असे नुकसान झाले, तर शेतातील ताली पडणे व शेतजमिनीत पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्याचा उदरनिर्वाह हा बहुतांशी शेतीवर अवलंबून असल्याने स्ट्रॉबेरी शेतीबरोबर इतर भाजी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पॉली हाऊस उभारली आहेत. वादळ आणि पावसाने तालुक्यातील सुमारे 80 पॉली हाऊसचे नुकसान झाल्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत शेतकरी सापडले आहेत. वादळाने पाचगणीतील वीज वितरण कंपनीचे अंदाजे 40 ते 45 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यात वृक्ष कोसळल्याने वीज वितरणचे 42 ते 45 खांब पडले, तर वीजतारांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, पाऊस आणि वादळाची तमा न बाळगता वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा तातडीने सुरळीत केला.
पाचगणी व महाबळेश्वर ही दोन्ही शहरे वनसंपदेने नटलेली आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांत उंचच उंच सिल्व्हर ओक आणि निरगिलीची झाडे वारे वाहू लागली, की काळजाचा ठेका चुकवतात. परवाच्या पावसात सुमारे 300 ते 400 छोटे- मोठे वृक्ष उन्मळून पडल्याचे चित्र आहे. पाचगणी पालिका कार्यालयाजवळ असणारी सिल्व्हर ओकची आठ ते दहा झाडे मंडईवर कोसळल्याने येथील खासगी इमारत, मंडईचे मोठे नुकसान झाले आहे. बरेचसे वृक्ष रस्त्यांवर कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, तर टेलिफोन, ऑप्टिकल केबल वायरस तुटण्याचे प्रकार घडल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले. एकूण "निसर्ग'ने तालुक्याला कोट्यवधींचा तडाका दिलेला आहे.
दरम्यान, आमदार मकरंद पाटील यांनी काल या नुकसानीचा आढावा घेऊन जनजीवन पूर्ववत करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
महाबळेश्वर तालुक्यात निसर्ग चक्री वादळाने घरे, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्याने बऱ्याच पॉली हाऊसचीही हानी झाली आहे. महसूल विभाग झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत आहे.- सुषमा पाटील, तहसीलदार, महाबळेश्वर
नेपाळ हा भारतासमोर अगदी पिटुकला देश आहे. तिथं बळाचा वापर करण्याचा मुद्दाच नाही
म्हाते खुर्द : मित्राला वाचविताना मित्रच गाळात रूतला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.