ड्रोनद्वारे शिवारात औषध फवारणी प्रात्यक्षिक यशस्वी  sakal
सातारा

सातारा : पिकांवर ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी!

महात्मा गांधी सोसायटीचा प्रथमच उपक्रम; शेतकऱ्यांना अल्प दरात मिळणार सुविधा

- विकास जाधव

काशीळ : हवामानातील बदलामुळे वाढत असलेली कीड, औषधांवरील वाढता खर्च, मजुरांची टंचाई, फवारणीवरील वाढता खर्च आदी कारणांमुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. यावर उपाय म्हणून ओझर्डे (ता. वाई) येथील महात्मा गांधी विविध कार्यकारी सेवा सोसायटीने चक्क ड्रोनची खरेदी केली आहे. या ड्रोनद्वारे गावातील शेतकऱ्यांची अल्प दरात फवारणी करून दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम, तसेच आर्थिक बचत होण्याबरोबर उत्पन्नात वाढ होणार आहे. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ड्रोन खरेदी करण्याचा राज्यात पहिलाच उपक्रम ठरण्याची शक्यता आहे.

ड्रोन खरेदीचा निर्णय हा ‘एक पाऊल प्रगतीचे, शेतकरी सभासदांच्या हिताचे’ या तत्त्‍वावर संस्थेने घेतला आहे. यामुळे शेतकरी सभासदांच्या कीटकनाशक फवारणीच्या खर्चात ५० टक्के बचत होणार आहे. पाच ते दहा मिनिटांत एक एकर फवारणी केली जाते. यामुळे पाणी बचतीसह पैशांची बचत होते. ऊस, हळद, सोयाबीन, गहू, हरभरा व मोकळ्या जागेत पडीक जमिनीवरील गवतावर सहज औषध फवारणी केली जाते.

ड्रोनद्वारे औषध फवारणी ही सुस्पष्ट, अचूक, समांतर व योग्य हवाई पद्धतीने होते. श्रम कमी होण्याबरोबर साप, विंचू चावण्याची भीती राहणार नाही, तसेच औषधाचा कोणताही आरोग्यावर परिणाम नाही. अल्प भाडेतत्त्‍वावर फवारणी करून दिली जाणार आहे.

ड्रोनद्वारे फवारणीचे फायदे...

  • दहा लिटर क्षमतेच्या टाकीतून नोझलमधून निघणारे तुषार हे अत्यंत लहान म्हणजे पिकांच्या पानावर असलेल्या पूर्ण छिद्राचे आकाराचे येतात, यामुळे औषधांचा अपव्यय होत नाही.

  • एकरी फक्त पाच ते दहा मिनिटांत फवारणी पूर्ण होते

  • ड्रोन हा बॅटरीवर चालणार असून, तो अर्ध्या तासात चार्ज होतो

  • एका बॅटरीच्या क्षमतेत अडीच एकर क्षेत्रावर फवारणी होऊ शकते

  • ड्रोनला जीपीएस जोडणी असल्याने शेतातील उंच पिकांवर सहजपणे हवाई फवारणी करणे शक्य होते

  • पाणी कमी लागत असल्याने पाण्याचीसुद्धा बचत होते

ओझर्डे येथील महात्मा गांधी विविध कार्यकारी सेवा सोसायटीने पिकांवर हवाई पद्धतीने फवारणी करण्यासाठी केलेली ड्रोन खरेदी संस्थेची आर्थिक प्रगती व शेतकरी सभासदांचे हित जोपासण्यासाठी पूरक ठरेल, असा विश्‍वास वाटतो.

-डॉ. राजेंद्र सरकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT