फलटण- सुरूर- वाई- महाडवरून मुंबई- गोवा  sakal
सातारा

Satara : गडकरींना आराखडा सादर ; सातारा- मुंबई प्रवासात दोन तासांची बचत शक्य

फलटण-महाड भक्ती-शक्ती महामार्गाचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबईला ये- जा करण्यासाठी पुणे, पनवेलमधील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शिवाय अंतरही अधिक असल्याने वेळही फार लागतो. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून फलटण- सुरूर- वाई- महाडवरून मुंबई- गोवा महामार्गमार्गे मुंबई जेएनपीटी असा ग्रीन फिल्ड हायवे झाल्यास सुमारे दोन ते अडीच तासांच्या वेळेसह इंधनाचीही बचत होणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारा हा मार्ग असल्याने उद्योग- व्यवसाय व नैसर्गिक, धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. त्यामुळे हा मार्ग प्रस्तावित भक्ती- शक्ती ग्रीनफिल्ड महामार्ग ठरणार असून, तो मार्गी लावावा, अशी मागणी जिल्हावासियांतून जोर धरू लागली आहे.

पुणे- बंगळूर महामार्गावरून मुंबई एक्स्प्रेस- वे’वरून मुंबईला जाताना पुण्यातील कात्रज ते वाकड या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांची दमछाक होते. शिवाय सुट्टीच्या दिवशी महामार्गावरील खंबाटकी, कात्रज बोगद्यात हमखास कोंडी असते. त्यामुळे दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याशिवाय पर्याय नसतो.

या गैरसोयीतून सुटका करून घेण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी जवळचा व पर्यायी मार्ग सध्या उपलब्ध नाही. याबाबत फलटण, सातारा, कोरेगाव, वाई आदी भागांतील लोकांनी एकत्र येऊन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. दोघांनीही याबाबत सकारात्मकता दाखविल्याची माहिती या महामार्गासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा करणारे नितीन चव्हाण यांनी दिली. हा मार्ग झाल्यास सातारा जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबईला ये- जा करण्यासाठीच्या वेळेत बचत होणार आहे.

असा आहे प्रस्तावित

ग्रीनफिल्ड मार्ग

फलटण- वाठार स्टेशन- सुरूर- वाई- धोम धरणमार्गे- ढवळे- महाड- दिघी पोर्ट- जेएनपीटी, मुंबई

आठ रस्त्यांना जोडणारा

  • आळंदी- पंढरपूर पालखी मार्ग फलटण येथे जोडणारा

  • बारामती - शंकेश्‍वर

  • पुणे - बंगळूरला पर्यायी मार्ग

  • नवीन रेवास - रेड्डी कोस्टल मार्ग

  • मुंबई - गोवा महामार्ग

  • अलिबाग - विरार

  • मुंबई- चिर्ले हा ट्रान्स हर्बल लिंक

  • महाड- पेन मार्ग

पर्यटनाच्या दृष्टीने सोईस्कर...

मुंबईवरून पंढरपूर या धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी या ग्रीन फिल्ड मार्गाचा वापर होऊ शकतो. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर, पाचगणी, कास, बामणोली, ठोसेघर, रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट, हरिहरेश्‍वर, श्रीवर्धन ही पर्यटनस्थळे जोडली जाऊ शकतील. महाडवरून दापोली, कर्दे, मुरुड बीच या ठिकाणीही जाण्यासाठी पर्यटकांना हा मार्ग सोयीचा आहे. थेट जेएनपीटी येथे जोडणारा हा मार्ग असल्याने पश्‍चिम महाराष्ट्राला व्यावसायिकदृष्ट्या फायद्याचा ठरणार आहे.

महाड- सातारा मार्गालाही पर्याय

प्रस्तावित महामार्ग सध्याच्या महाड- सातारा रस्त्याला उत्तम पर्याय ठरू शकेल. सद्यःस्थितीत महाडला जाणारा मार्ग मोठ्या घाटवळणांचा असल्याने अवजड वाहनांनाही तो जिकिरीचा ठरतो. प्रस्तावित महामार्ग समुद्रसपाटीपासून अवघ्या ८०० मीटर उंचीवर असणार आहे. त्यामुळे इंधनातही मोठी बचत साध्य करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT