फलटण शहर : फलटण शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राजकीय व महसुलीदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले कोळकी गाव अवैध धंद्याचे केंद्रबिंदू बनत चालले आहे. गांजा, गुटखा, सिगारेट, अवैध दारूसह आता मटकाही अगदी मध्यवर्ती वस्तीत येऊन पोचला आहे. या अवैध धंद्यांच्या विळख्याचा मोह उच्चशिक्षित तरुणांनाही आकर्षित करू लागल्याचे भयावह चित्र दिसू लागले आहे.
कोळकी गावचा विस्तार व लोकसंख्या वाढल्याने येथील अवैध धंद्याचे प्रमाण व प्रकारही वाढत गेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असले, तरी कोळकीत मात्र, अवैधपणे गुटखा, सिगरेट, तंबाखूची खुलेआमपणे विक्री होत असल्याने सायंकाळनंतर शहरातून उडाणटप्पूंच्या गाड्या कोळकी गावात येत असल्याचे दृष्य आजही आहे. त्यामुळे गावासह शहरास गुटख्याची डिलेव्हरी देणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. गावातील पुनर्सवसन क्षेत्रातील इमारती अवैध धंदे व अश्लील चाळ्यांच्या केंद्रबिंदू ठरलेल्या आहेत. या ठिकाणी सकाळपासूनच डाव तर रंगतोच; परंतु गांजा व नशेच्या विविध प्रकारच्या साधनांचाही खुलेआम वापर केला जात असल्याचे पाहावयास मिळते; परंतु संबंधितांना वेसन घालणार कोण? याचीच चिंता परिसरातील नागरिकांना आहे. पुनर्वसनात अवैधपणे चालत असलेल्या व्यसनांच्या विळख्यात माध्यमिक शाळेतील विद्यार्थीही अडकत चालले आहेत, ही पालकांसाठी धोक्याची घंटा आहे. गेल्या काही महिन्यांपासून मटक्याचेही केंद्रबिंदू ठरत असून, गावच्या मध्यवर्ती भागातही आता मटका खेळला जाऊ लागला आहे. मटका व यामधून मिळणाऱ्या पैशाची भुरळ आता येथील उच्चशिक्षित, सुशिक्षित बेरोजगार युवक, तरुणांनाही पडू लागल्याचे चित्र दिसत आहे. या मटक्याचे बस्तान बसण्यासाठी गावातील व शहरातील "नामांकितांचे' पाठबळ प्राप्त होत असल्याचीही चर्चा आहे. गावात हॉटेलचे प्रमाण मोठे आहे; परंतु यापैकी काही हॉटेलमध्ये विनापरवाना दारूविक्री होत आहे. गावात शांतता व वर्दळ कमी असणारी ठिकाणे तळीरामांनी "ओपन बार' बनविल्याचे चित्र आहे. दारू पिल्यानंतर गोंधळ करणे, भरधाव वेगाने गाड्या चालविणे हे प्रकार नित्याचे होऊन बसले आहेत.
कोळकी गावची ओळख सुशिक्षितांचे गाव अशी आहे. गावामध्ये कोणी अवैध धंद्यांना चालना अथवा पाठबळ देत असेल, तर त्यास थारा दिला जाणार नाही. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेने कठोर पावले उचलावीत.
- सचिन रणवरे, सदस्य, पंचायत समिती
""अवैध धंद्यांना लगाम घालण्याबरोबरच त्यास पाठबळ देणाऱ्या प्रवृत्तींना रोखणे आवश्यक आहे. गावात कोणी चुकीचे वागत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. पालकांनीही आपली मुले कोणाच्या संगतीत आहेत, यावर लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे.''
- जयकुमार शिंदे, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन
झाडाखाली उडवला लग्नाचा बार!
नो मॅन लॅण्डवर शेकरुंची जोडी
परजलेली हत्यारे आठ दिवसात म्यान
कर्मचाऱ्यांचा दुष्काळ... आपत्ती व्यवस्थापन कोसळणार
संपुर्ण लॉकडाऊनच्या काळात घरात कोणाला काय हवे, काय नको याची काळजी घेतली. वेळ प्रसंगी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या बाहेर जाण्याच्या हट्टाला खंबीरपणे नाही म्हणण्याचे धाडसही दाखविले. वाचा तिच्या भावना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.