दहिवडी (जि. सातारा) : काँग्रेसमधील (congress) कुरघोड्यांच्या राजकारणाला (politics) माण तालुक्यात (mann taluka) ऊत आला आहे. माण तालुका काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी दादासाहेब काळे यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाल्याने काँग्रेस अंतर्गत कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. काँग्रेस धनगर समाजावर (dhangar community) अन्याय करत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले असून त्याला उत्तर म्हणून विविध दाखले देत काँग्रेसने नेहमीच धनगर समाजाला झुकते माप दिले असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. (satara-political-news-congress-president-election-mann)
थेट मुंबईतून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या हस्ते दादासाहेब काळे यांनी तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्तीचे पत्र मिळवले. त्याची माहिती मिळताच माण-खटाव तालुक्यात कुठे जल्लोष झाला, तर कुठे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यानंतर अतिशय वेगाने चक्र हलली अन् दुसऱ्याच दिवशी या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांना देण्यात आले. सातारा जिल्हा काँग्रेस समितीला विचारात न घेता व प्रदेश काँग्रेसला अंधारात ठेवून नियुक्ती करण्यात आली असल्याचे वरिष्ठांना पटवून देवून ही स्थगिती आणण्यात आली.
या नियुक्तीला स्थगिती मिळाल्याने दादासाहेब काळे समर्थक तसेच धनगर युवकांमध्ये रोष निर्माण झाला. काँग्रेस पक्ष व पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांच्याबद्दल समाजमाध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट पसरविण्यात आल्या. विकास शेंबडे, पंकज पोळ या युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त करून योग्य तो निर्णय घेण्याचे वरिष्ठांना आवाहन केले. स्वतःच्या मर्जीतील व्यक्तींकडेच सर्व पदे असावीत, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या खटाव तालुक्यातील नेत्यांनी माणमध्ये लुडबूड करू नये, असा इशाराही दिला.
माण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. संदीप सजगणे यांनी काँग्रेस पक्ष हा स्थापनेपासून धनगर समाजासोबत असून कुणीही धनगर समाजाचा मालक होण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला लगावतानाच प्रदेश युवक काँग्रेसचे पद श्री. काळे यांच्याकडे असल्याचे निदर्शनास आणून दिले. पद मिळणे व स्थगिती येणे यात समाजाचा प्रश्नच नाही, उलट स्थगिती मिळण्यास बोराटवाडीशी असलेले स्नेहसंबंध कारणीभूत नाहीत ना? असा प्रश्नही अॅड. सजगणे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल चुकीचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस आणखी दुबळी होण्याची भीती
हा सर्व प्रकार माण, खटावमध्ये कमकुवत असलेली तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सत्तेत नसलेली काँग्रेस अजून दुबळी होण्यास कारणीभूत ठरणार तर नाही ना, असा प्रश्न काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सतावू लागला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.