MLA Jaykumar Gore esakal
सातारा

'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या येण्याने नाखूष असतात'

विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : गेल्या १५ वर्षांत जंग जंग पछाडूनही तुम्हाला माण- खटावमधील वाऱ्याची दिशा समजली नाही. महाराज, तुम्ही जेव्हा- जेव्हा माणमध्ये आला. तेव्हा तुमचा पक्ष आणि तुमचे बगलबच्चे निवडणुका हरल्याचा इतिहास तुमच्या नावे झाला आहे. तुमचे अतिक्रमण इथल्या स्वाभिमानी जनतेने नेहमीच हाणून पाडले आहे. आजपर्यंत तुम्ही पालकमंत्री, विधान परिषद सभापतिपदाची आयुधे घेऊन माणमध्ये आला. आता ही सगळी राजकीय आयुधे बाजूला ठेऊन मैदानात यायचे धाडस दाखवा, असे खुले आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना दिले. माण- खटावमध्ये वाऱ्याची दिशा शोधणाऱ्या तुमच्या होकायंत्राला आमच्या शुभेच्छाच आहेत. मात्र, आग लावून कांड्या पिकवायचे धंदे आता बंद करा, असा टोलाही त्यांनी लगावला. (satara-political-news-jaykumar-gore-criticize-ramraje-naik-nimbalkar-mann)

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापती रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत सभा झाली. त्या वेळी रामराजेंनी माणमधील वाऱ्याचा अंदाज घ्यायला आलोय, कार्यकर्त्यांना मान खाली घालावी लागेल, अशी तडजोड होणार नाही, अशी वक्तव्ये केली होती. आमदार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला.

गोरे म्हणाले, ‘‘मी राजकारणात आल्यापासून गेल्या १५ वर्षांत राजेंना माणमधील वाऱ्याची दिशा समजली नाही. ते जेव्हा- जेव्हा इथे आले, तेव्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस निवडणुकांमध्ये पराजित झाली. राजेंचे अतिक्रमण इथल्या जनतेने प्रत्येक वेळी हाणून पाडले. आपण माण- खटावमध्ये बिन बुलाये महेमान असता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या येण्याने नाखूष असतात. आपला पायगुण चांगला नसल्याचे कार्यकर्त्यांना माहीत आहे. त्यामुळे जबरदस्तीने त्यांच्यावर नेतृत्व लादायच्या भानगडीत पडू नका. आमचे म्हणणे खरे आहे, की नाही हे एकदा तपासून पाहा. तुमच्या कार्यकर्त्यांची भावना एकदा जासूसी करून जाणून घ्या.’’

गोरे म्हणाले, ‘‘राजे आपल्याला निवडणुकीपुरताच माण- खटाव आठवतो. गेल्या १४ महिन्यांपासून इथली जनता कोरोनाला मोठ्या धैर्याने तोंड देत आहे. अनेक जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने अनेक संसार उघड्यावर पडले. लोकांना उपचारासाठी बेड मिळत नव्हते. तेव्हा तुम्ही कोणते होकायंत्र शोधत होता. तुमच्या आशीर्वादाने, की शापाने एकत्र आलेले आमचं ठरलयवाले त्या काळात दडी मारून बसले होते. तुमच्या राष्ट्रवादीच्या आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांना गरज होती, तेव्हा आम्हीच बेड उपलब्ध करून दिले आहेत.’’

राजकीय कटकारस्थाने करायला माणमध्ये अवश्य या. त्यासाठी तुमचे स्वागतच आहे. मात्र, इथली जबाबदारी घ्यायचे पुण्यकर्म आपण कधीच केले नाही. एकतर तुम्हाला कुणीही मनापासून विचारत नाही. तुम्ही इथे आग लावून कांड्या पिकवण्याचे उद्योग करता, असे तुमचेच पदाधिकारी खासगीत बोलतात.

आमदार जयकुमार गोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT