सातारा

'शिवेंद्रसिंहराजे कधीही कुणाच्या नादाला लागत नाहीत, लागलेच तर त्याचा नाद संपवल्याशिवाय गप्प बसत नाहीत'

उमेश बांबरे

सातारा : शिवेंद्रराजे... बेरजेचे राजकारण करू नका, कोणी तुमच्या अंगावर आले तर तुम्ही सुध्दा अंगावर जायला पाहिजे. तरच समाज तुमच्या मागे उभा राहील, अन्यथा समाज म्हणेल हे दोन नेते दाखवायला भांडत आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंनी बाहेर भांडणे दाखवून आतून "सेटलमेंट' करू नये. त्यांच्यामागे जावळी व सातारा जिल्हा पाठीशी आहे. शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale) कधीही कुणाच्या नादाला लागत नाहीत आणि जर कोणी त्यांच्या नादाला लागले तर त्याचा नाद संपवल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत, असे भाजपा नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी नुकतेच नमूद केले.

गेल्या काही दिवासंपासून भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात जावळी तालुक्‍यावरून वाद रंगला. त्यापार्श्वभुमीवर नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजेंचे काैतुक करुन शशिकांत शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. हे करीत असताना पाटील यांनी राजेंना सल्लाही दिला आहे.

पाटील म्हणाले, ""शिवेंद्रसिंहराजे हे फार शांत आणि संयमी नेते आहेत. ते त्यांच्या पध्दतीने मतदारसंघात काम करतात. काेणाच्या आधी-मधी पडत नाहीत. पण कोणी जर तुमच्या घरात घुसत असेल तर तुम्ही त्याला अडविले पाहिजे, त्याला जागा दाखविली पाहिजे. तुमच्या वाटेला कोणी तरी आले तरी तुम्ही त्यांच्या वाटेला गेले पाहिजे असा सल्ला पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिलाय. ""माथाडी संघटनेत शशिकांत शिंदे आमच्यासोबत एकत्र होते. पण, खासदारकीच्या निवडणुकीत शिंदेनी शिवसेना-भाजपचे उमेदवार म्हणून माझ्याविरोधात काम केले. खरंतर शिंदेंनी स्वतःची जबाबदारी सांभाळून इतर ठिकाणी ढवळाढवळ करण्याची गरज नाही. 

शिवेंद्रसिंहराजे, तुम्ही बेरजेचे राजकारण करू नका, कोणी तुमच्या अंगावर आले तर तुम्हीसुध्दा अंगावर जायला पाहिजे. तरच समाज तुमच्या मागे उभा राहील, अन्यथा समाज म्हणेल हे दोन नेते दाखवायला भांडत आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंनी बाहेर भांडणे दाखवून आतून "सेटलमेंट' करू नये. त्यांच्यामागे जावळी व सातारा जिल्हा पाठीशी आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान शिवेंद्रसिंहराजे कधीही कुणाच्या नादाला लागत नाहीत आणि जर कोणी त्यांच्या नादाला लागले तर त्याचा नाद संपवल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

Positive Story : प्लॅस्टिकच्या समस्येवर सातारकरांनी शोधला नवा उपाय; युवकांच्या स्टार्टअप प्रयत्नांना मोठं यश

यशवंतरावांनी नागा साधूंचा मोर्चा हाताळला; मोदी सरकारला शेतकरी आंदोलन का हाताळता येईना?

सहलीहून परतल्यानंतर 33 विद्यार्थी कोरोनाबाधित? युद्धपातळीवर उपाययाेजना सुरु

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT