सातारा

एक दूसरे से करते प्यार हम! राष्ट्रवादीत आल्यास 'त्यांच्या' नेतृत्वात पॅनेल उभारु; भाजप आमदारास राष्ट्रवादीच्या नेत्याची माेठी ऑफर

सिद्धार्थ लाटकर

सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा आणि जावळी तालुक्यात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (Shivendra Raje Bhosale) आणि आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात राजकीय घमासान सुरु आहे. गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात हे दाेन्ही आमदार एकाच काेचवर बसल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या हाेत्या. आता पुन्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजप (Bhartiya Janta Party) आमदार शिवेंद्रसिंहराजेंना राष्ट्रवादीत येण्याची आॅफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेस उधाण आले आहे.
 
राष्ट्रवादी काॅंग्रेसने आयाेजिलेल्या जनता दरबारानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी शिंदे यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीविषयी भुमिका जाहीर केली. ते म्हणाले, ही निवडणुक आमची बिनविरोध करण्याचा प्रयत्न राहील. पक्ष विरहीत निवडणुकीसाठी आम्ही सर्व जण काम करणार आहोत. 

शिवेंद्रसिंहराजेंसोबतचा वादानंतर तुम्ही यु टर्न घेत्याची चर्चा आहे यावर ते म्हणाले, शिवेंद्रराजेंबरााेबर माझे वैयक्तिक भांडण नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी ते असेल. या वेळी आम्ही पालिकेत स्वतंत्र पॅनेल टाकणार आहे. सातारा पालिकेत मी आणि दीपक पवार पॅनेलचे नेतृत्व करू. शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल असेल, असे त्यांनी जाहीर करुन टाकले.

दरम्यान मी सातारा-जावळीतून लढावे, असे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी यापुर्वीच्या निवडणुकीत सांगितले होते; परंतु आता मी श्री. पवार यांच्या सांगण्यावरून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष, संघटना आणखी मजबूत करण्याचे करत आहे. मी आजपर्यंत कधीही पक्षाने दिलेली जबाबदारी टाळलेली नाही. पुढील काळात मी कोरेगाव मतदारसंघातूनच निवडणूक लढवेन असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जनता दरबारात पालकमंत्री येतील 

पालकमंत्री मुंबईत जनता दरबार घेतात; पण सातारा जिल्ह्यातील जनता दरबारासाठी ते का उपस्थित राहात नाहीत, या प्रश्‍नावर शिंदे म्हणाले, ""गेल्या अनेक वर्षांपासून खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार मी जनता दरबार सुरू केला. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध कामानिमित्त पालकमंत्री दौऱ्यावर असल्याने त्यांना साताऱ्यातील जनता दरबारास उपस्थित राहता येत नसेल; पण आगामी जनता दरबारास पालकमंत्री उपस्थित राहतील.''

फालतू बोलू नका, कसलं राजकारण.., म्हणून तरं खंडणीची केस पडली माझ्यावर; उदयनराजे भडकले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT