Satara Latest Marathi News 
सातारा

खटाव-माण तालुक्यातील 68 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात; प्रभाकर देशमुख, घार्गेंची माहिती

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीनंतर खटाव-माण तालुक्यातील १२० पैकी ६८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे, तर काही ठिकाणी समविचारी पक्षांसोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तेत असल्याची माहिती निवृत्त आयुक्त व खटाव-माण राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. त्यामध्ये खटाव तालुक्यातील ३७ व माण तालुक्यातील ३१ अशा एकूण ६८ ग्रामपंचायती आहेत.

यावेळी पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम-पाटील, उपसभापती हिराचंद पवार, मनोज पोळ, सुभाष नरळे, श्रीराम पाटील, माणचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष सुनिल गोडसे, विजय खाडे, प्रा. कविता म्हेत्रे, माणचे उपसभापती तानाजी कट्टे, श्री. काटकर, ज्ञानेश्वर शिंदे, गोविंद पवार, प्रा. कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादीने वर्चस्व प्राप्त केलेल्या खटाव तालुक्यातील ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे : अंबवडे, येळीव, लोणी, नांदोशी, कणसेवाडी, मानेवाडी (तुपेवाडी), डाळमोडी, गुंडेवाडी, तडवळे, नायकाचीवाडी, भुरकवडी, पेडगाव, जायगाव, पळशी, भोसरे, गुरसाळे, येरळवाडी, कातरखटाव, ढोकळवाडी, चितळी, तरसवाडी, उंबर्डे, गोसाव्याचीवाडी, गोपूज, नागाचे कुमठे, खबालवाडी, बोंबाळे, दातेवाडी, हिरवाडी, कलेढोण, मुळीकवाडी, वरूड, कारंडेवाडी, कळंबी.

राष्ट्रवादीने वर्चस्व प्राप्त केलेल्या माण तालुक्यातील ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे : इंजबाव, काळचौंडी, किरकसाल, कुक्कूडवाड, खडकी, गोंदवले बुद्रुक, गोंदवले  खुर्द, जांभुळणी, जाशी, डंगिरेवाडी, ढाकणी, दिवडी, देवापूर, धामणी, पर्यंती, पानवण, पिंगळी बुद्रुक, भाटकी, भालवडी, भांडवली, मार्डी, रांजणी, लोधवडे, वडजल, वरकुटे म्हसवड, वाकी, वारूगड, शिंदी खुर्द, शिंदी बुद्रुक, शिरवली, हवालदारवाडी या ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.

यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांच्या स्थानिक कार्यकर्ते एकत्र येऊन लढतात. त्यामुळे त्यांनी कोणत्याही एका पक्षाची भूमिका न घेता तटस्थ रहावे लागते. अशी तटस्थ राहण्याची ज्यांनी भूमिका घेतली आहे, त्या पदाधिकाऱ्यांचेही मनापासून स्वागत, तसेच विकास कामांबरोबरच गावातील सलोख्याचे वातावरण कायम टिकविण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सहकार्य राहील. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत असल्याने विकासकामांना मोठी संधी आहे. दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कायदा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांसंदर्भात कोरोना कालावधीनंतर मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

माजी आमदार श्री. घार्गे म्हणाले, खटाव-माण मतदार संघाव्यतिरिक्त खटाव तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती कऱ्हाड उत्तर व कोरेगाव विधानसभा मतदार संघात आहेत, त्याठिकाणीही पक्ष कार्यकर्त्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. कऱ्हाड मतदार संघातील बहुतांशी गावे राष्ट्रवादीमय झाली आहेत. तर कोरेगाव  मतदार संघातील खटाव, पुसेगाव गटातील अनेक ग्रामपंचायतीवर पक्षाचा झेंडा फडकला आहे. उपसभापती हिराचंद पवार यांनी आभार मानले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT