Mahaganpati temple wai esakal
सातारा

Satara Rain : वाईत महागणपती मंदिराच्या पायरीपर्यंत पाणी; धोम धरणातून विसर्ग वाढविल्याने कृष्णा नदीला पूर

सकाळ डिजिटल टीम

धोम धरण पाणलोट क्षेत्रात १९ मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण ८०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने धोम धरणातून (Dhom Dam) सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग ३६२२ क्युसेकपर्यंत वाढवल्याने कृष्णा नदीला (Krishna River) पूर आला असून, नदीचे पाणी महागणपती मंदिराच्या (Mahaganpati Temple) दक्षिण बाजूच्या पायरीपर्यंत पोचले आहे.

शहर व परिसरात काल रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. सकाळी पावसाचा जोर ओसरला. तालुक्याच्या पश्चिम भागात अद्यापही पाऊस सुरू आहे. मागील २४ तासांत धोम- बलकवडी पाणलोट क्षेत्रात ६५ मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण १९२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात १२३६ क्युसेक पाणी आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी ८०९ मीटर झाली असून, पाणीसाठा ३.४३ टीएमसी इतका आहे. धरण ८४.१५ टक्के भरले आहे. या धरणातून १२९८ क्युसेक पाणी धोम धरणात येत आहे.

धोम धरण पाणलोट क्षेत्रात १९ मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण ८०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात ५३१३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी ७४५ मीटर झाली असून, पाणीसाठा ११.३८ टीएमसी इतका आहे. धरण ८४.३० टक्के भरले आहे. पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धोम धरणांचे वक्रद्वार क्रमांक एक व पाच हे ०.५० मीटर व वक्रद्वार क्रमांक २ व ४ हे ०.२५ मीटरने उघडून सांडवा २१२७ क्युसेकमध्ये १२१३ क्युसेकने वाढ करून एकूण ३३४० क्युसेक व धोम विद्युतगृहातून २८२ क्युसेक असा एकूण ३६२२ क्युसेक विसर्ग कृष्णा नदीपात्रात सोडला आहे. आसरे बोगद्यातून धोम- बलकवडी कालव्यात एकूण २०० क्युसेकने सोडण्यात आला आहे.

नदीपात्रात प्रवेश करू नये

पावसाचे प्रमाण व आवकेनुसार त्यामध्ये कपात अथवा वाढ करण्यात येईल. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic Updates: मुंबईतील अनेक रस्ते 23 सप्टेंबर रोजी बंद; जाणून घ्या पर्यायी मार्गांविषयी सर्वकाही

Amit Shaha Nashik Dura : व्हिआयपी बंदोबस्तासाठी पोलिस सज्ज; केंद्रीय गृहमंत्री 25 ला नाशिकमध्ये

Bigg Boss Marathi S5 : बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेल बाहेर ! प्रेक्षक म्हणाले...

Pakistan Cricket: पाकिस्तानला क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का! WTC मधील मालिका तोंडावर असताना मीडिया हक्कच कोणी खरेदी करेना

NPS Vatsalya Scheme : ‘एनपीएस वात्सल्य’ बचतीसह पेन्शन सुविधा

SCROLL FOR NEXT