आमदार मकरंद पाटील 
सातारा

लोणंदच्या सत्तापटलावर आमदार मकरंद पाटील यांना स्‍थानिकांचा धक्‍का

रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : नगराध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे संकेत मिळताच भाजपमध्ये प्रवेश करून सचिन शेळके यांनी नगराध्यक्षपद टिकवले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व भाजपने एकत्र येऊन त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची तयारीही केली होती; परंतु ठरावावरील ऐन मतदानावेळी राष्ट्रवादीचाच नगरसेवक फुटला आणि नगराध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा सचिन शेळकेंकडेच कायम राहिल्याने ते या साऱ्या सत्ताकारणात "बाजीगर' ठरले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व भाजपच्या मतलबी राजकारणालाही त्यांनी चांगलीच चपराक लगावली आहे. 

लोणंद नगरपंचायतीत सुरुवातीपासूनच सत्ता संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व भाजप अशा तिरंगी, चौरंगी लढती रंगल्या. त्या वेळी जनतेने कोणाच्याच बाजूने स्पष्ट बहुमताचा कौल दिला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसला आठ, कॉंग्रेसला सहा, भाजपला दोन, तर एक अपक्ष असे बलाबल झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडीवेळी आमदार मकरंद पाटील यांनी भाजपच्या दोन सदस्यांच्या सहकार्याने नगरपंचायतीत सत्ता प्रस्थापित केली. सुरुवातीला जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके- पाटील यांच्या पत्नी स्नेहलता शेळके- पाटील यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. त्या वेळी भाजपकडे उपनगराध्यक्षपद गेल्याने लक्ष्मणराव शेळके- पाटील यांना संधी मिळाली; परंतु त्या वेळीही सचिन शेळके- पाटील यांच्याच नावाची जोरदार चर्चा होती. 

नगराध्यक्षपदासह अनेक मोठ्या ऑफर त्यांना आल्या. मात्र त्या वेळी त्यांची संधी हुकली होती. त्यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी बेरजेचे राजकारण करताना अपक्ष असलेले सचिन शेळके- पाटील यांना पक्षात घेऊन नगराध्यक्षपदाची संधी दिली. राष्ट्रवादी व भाजपच्या सहकार्याने ते नगराध्यक्ष, तर भाजपचे किरण पवार हे उपनगराध्यक्ष झाले. मात्र, पक्षांतर्गत कार्यकाळ संपत येताच श्री. शेळके- पाटील यांनी मुंबईत जाऊन भाजपमध्ये प्रवेश करून नगराध्यक्षपद शाबूत ठेवले. 

आमदार मकरंद पाटील यांनी सचिन शेळके- पाटील यांना पक्षात घेऊन नगराध्यक्ष पदाची संधी दिली. त्या वेळी पक्षाशी प्रामाणिक असणारे काही नगरसेवक आतून नाराज झाले. बाहेरून येणाऱ्यांना संधी मिळणार असेल तर आपले काय? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामध्ये विशिष्ट समाजाला संधी देण्याचा आमदार श्री. पाटील यांनी दिलेला शब्द आज ना उद्या खरा होईल, या आशेवर काही जण पक्षाशी ठाम होते. मात्र, निवडणुकीला केवळ 11 महिने उरले, तरी काही होण्याचे चिन्ह दिसत नाही आणि झाले तरी किती कालावधी मिळणार? असा सवाल येणे साहजिकच होते. नेमकी ही खदखद ठेवत श्री. शेळके- पाटील यांच्यावरील अविश्वास ठराव वेळी राष्ट्रवादीतील अत्यंत विश्वासू व गटनेते असलेल्या योगेश क्षीरसागर यांनी आमदार मकरंद पाटील यांना घरचा आहेर देत त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातून सचिन शेळके- पाटील यांच्यावरचा अविश्वास ठराव मंजूर झाला, तर नगराध्यक्षपदाची कॉंग्रेसला संधी देण्याची केली जाणारी चर्चा म्हणजे ज्यांच्याविरुद्ध निवडणूक लढलो त्यांनाच आपणाकडून संधी मिळणार असेल, तर काय साध्य केले? या विचाराने योगेश क्षीरसागर यांनी सचिन शेळके- पाटील यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतल्याचा कयास आहे.

या निर्णयामुळे एकीकडे आमदार मकरंद पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करताना दुसरीकडे सत्तेसाठी टपलेल्या कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेऊन निदान दुभंगलेल्या धनगर व माळी समाजातील दरी या निमित्ताने कमी करण्याच्या भावनेतूनच योगेश क्षीरसागर यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 

यामध्ये आमदार मकरंद पाटील यांच्याकडून वेळोवेळी दुखावलेले तालुक्‍यातील जिल्हा परिषदेचे माजी सभापती आनंदराव शेळके- पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे- पाटील व खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे- पाटील यांनी आतून या प्रक्रियेत सहभागी होत आमदार मकरंद पाटील यांना शह देण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला आहे, असेही मत मांडण्यास राजकीय धुरिणांना संधी मिळाली आहे. मतदानासाठी सभागृहात जाण्यापूर्वी थंड हवेच्या ठिकाणाहून मोटारीतून आलेले 13 नगरसेवक आम्ही ठाम असल्याचे सांगत होते. सोशल मीडियावरूनही तसा फोटो व्हायरल केला. मात्र, मतदान प्रक्रियेच्या वेळी अशी कोणती जादू झाली, की योगेश क्षीरसागर यांनी ठरावाच्या विरुद्ध जात सचिन शेळके- पाटील यांच्या बाजूने मतदान केले. ही जादू ऐन वेळी होणारी नसून मामा, बापू व दादा यांनी रात्रंदिवस सर्वांशी संपर्कात राहून केलेली जादूची किमया असल्याची चर्चाही येथे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT