कऱ्हाड (जि. सातारा) ः सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट्याबरोबरच पर्यावरणाचे राखणदार असलेल्या गिधाडांच्याही नोंदी ठेवल्या जाणार आहेत. सह्याद्री व्याघ्रमधील गिधाडांचे वास्तव्य, त्यांची भ्रमंती, कड्या कपारातील त्यांच्या घरट्याचा मागोवा घेऊन त्याच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न होणार आहेत. कोकणातून येणाऱ्या गिधाडांच्याही नोंदी घेतल्या जाणार आहेत. "सह्य्राद्री व्याघ्र'तर्फे अनोखा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.
"चला निसर्गाचे राखणदार वाचवूया,' अशी हाक देत सह्याद्रीच्या कड्याकपारीत भटकणाऱ्या गिधाडांच्या वास्तव्याचा मागोवा घेण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने एक पाऊल टाकले आहे. त्यासाठी कारणीभूत ठरला तो प्रकल्पातर्फे साजरा झालेला जागतिक गिधाड जनजागृती दिन. व्याघ्र प्रकल्पात फिरून गिधाडांच्या नोंदी व त्यांच्या ठिकाणांचे पुनरुज्जीवन करण्यावरही त्या वेळी चर्चा झाली. त्यामुळे क्षेत्रीय भेट व निरीक्षण पदभ्रमण करत गिधाडांची माहिती घेण्याचा निर्णय झाला आहे. व्याघ्र प्रकल्पातील गिधाडांचे वास्तव्य व त्यांची घरटी कोठे होती. त्या ठिकाणांचा मागोवा घेताना त्यांच्या भ्रमंतीवरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. गिधाडांचे पुनरुज्जीवनासाठी काय करता येईल, याचाही अभ्यास केला जाणार आहे. मात्र, सध्या तरी व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना भागात फिरून निरीक्षणही नोंदविण्याचे काम आहे. स्थानिकांकडून पूर्वी गिधाड आढळत होती, त्याच्या नोंदी घेण्यात येत आहेत. त्याप्रमाणे त्या जागांचीही नोंद घेतल्या जात आहेत.
वाघाबरोबरच पर्यावरणासाठी स्वच्छतेचे गिधाडेही महत्त्वाचे काम करतात. त्यांना परिस संस्थेचे स्वच्छता दूत म्हटले आहे. "सह्याद्री व्याघ्र'मध्ये अशी गिधाडे होती. मात्र, सध्या त्यांचे वास्तव्य दिसत नाही. त्यामुळे गिधाडांचे वास्तव्य, त्यांची भ्रमंती व त्यांच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नेमकी ठिकाणे समजल्यानंतर आराखडाही होऊ शकतो, अशी माहिती प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी दिली.
"सह्याद्री व्याघ्र'मध्ये याठिकाणी होते गिधाडांचे वास्तव्य
- भैरवगडाच्या कोकण किनारपट्टीचा सह्याद्रीच्या रांगा
- प्रचितीगडाच्या सगळ्या बाजूच्या कड्या कपारी
- बामणोली परिसरातील महिमानगड, चकदेव, आंबवली दरा
- पश्चिमेकडील भागात सह्याद्रीचे सलग उंच कड्या कपारीत
- चांदोलीतील धोक्याच्या कड्यावरील पर्वत रांगा
- मालदेव, वासोटा व नागेश्वरच्या दऱ्या अन् कड्याकपारी
- तिवरे परिसरातील कड्याकपारी
संपादन ः संजय साळुंखे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.