गोंदवले (जि.सातारा) : आनंदाचे कोणतेही क्षण असो. एकमेकांचे तोंड गोड करण्यासाठीचा मान पेढ्यालाच असतो. आनंदाच्या क्षणाचा नजराणा देण्यासाठी देखील पेढ्याचाच वापर केला जातो. त्यात सातारी कंदी पेढा तर नेहमीच अधिक भाव खाऊन जातो. खास प्रसिद्ध असलेल्या सातारी कंदी पेढ्याला नेहमीच खूप मोठी मागणी असते. गेल्या अडीच महिन्यांपासून मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने सगळीकडे लॉकडाऊन झाले. तसा हा कंदी पेढा देखील लॉकडाउन झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लॉकडाउनमुळे सर्वच धार्मिक स्थळे बंद झाली. त्यामुळे प्रसादाचा पेढा दिसेनासा झाला. मिठाईची दुकाने लॉक झाली. लग्न समारंभ असो व नामकरण विधी... सगळेच समारंभ ठप्प झाल्याने कढईत खवा घोटला गेलाच नाही. आपत्ती काळात शालेय परीक्षा झाल्याच नाहीत. त्यामुळे एक मे ही तारीख यंदा निकालाविनाच गेल्याने या दिवशी पेढ्याची होणारी मोठी विक्री यंदा शून्यच राहिली. प्रत्येक आनंदी क्षण दुरावल्याने यावेळी पेढा उत्पादक व विक्रेता मोठ्या अडचणीत सापडला आहे.
सुरुवातीला अचानक लॉकडाऊन झाल्याने तयार असणारे पेढे काही दिवसानंतर खराब झाले. त्यामुळे व्यावसायिकांवर पेढे अक्षरशः टाकून देण्याची वेळ आली. पेढा तयार करण्यासाठीचा खवा व इतर कच्च्या मालाची सामग्री वाया गेलीच. शिवाय मोठ्या प्रमाणात तयार असलेल्या मालाला ग्राहक नसल्याने उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले. अनेक वर्षांपासून या कामात असलेले कारागीर व मजूरांवर बेरोजगारीची वेळ आली. परंतु पुन्हा आवश्यकता असल्याने पेढा उत्पादकांना नाईलाजास्तव का होईना त्यांना आगाऊ उचल द्यावी लागली. मात्र लॉकडाउन वाढत गेल्याने या मजुरांची घरवापसी झाल्याने उचल म्हणून दिलेली रक्कम बेभरवशी खात्यात जमा झाल्याची खंत उत्पादकांमधून व्यक्त होत आहे. सातारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कंदी पेढ्यांसाठी लागणारा खवा हा पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बार्शी आदी गावांतून मोठ्या प्रमाणात येतो. लॉकडाऊनमुळे आणि जिल्हा अंतर्गंत वाहतुक बंदीमुळे सातारा जिल्ह्यात खव्याची आवकच कमी झाली. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे व्यवसायाच्या परिस्थितीत सुधारणा होईल अशी आशा व्यक्त होत आहे. परंतु कच्चा मालाच्या पूरवठ्यावरच सारे काही अवलंबून आहे असे चित्र सध्या तरी आहे. परिणामी आनंदाच्या क्षणांत लॉकडाऊन झालेला सातारी कंदी पेढा आता मिठाई व्यावसायिकांकडे उपलब्ध हाेत असल्याने त्याची चव नागरीकांच्या जिभेवर रेंगाळत जरी असली तरीही छोटे मोठे विक्रेते आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांच्या नजरा राज्य सरकार घाेषीत करीत असलेल्या पॅकेजवर खिळल्या आहेत.
गेल्या अडीच महिन्यांपासून उद्योग व्यवसाय ठप्प झाला आहे. लॉकडाऊनचा बंदचा परिणाम छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर देखील झाला आहे. यात्रा, धार्मिक विधी, सण समारंभच बंद राहिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनाची परिस्थिती अटोक्यात येत नसल्याने भाविकांची वर्दळही कमीच आहे. मिठाई व्यावसायिकांवर ओढवलेल्या या संकटातून बाहेर येण्यासाठी शासनाने सहकार्य करावे.
- दादासाहेब यादव, पेढा उत्पादक (गोंदवले)
उद्यापासून आम्ही रेशनिंगचे वाटप करणार नाही : दुकानदारांचा सरकारला इशारा
गृहिणींसाठी महत्वपुर्ण बातमी
खंडोबा देवस्थानच्या मानकऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब
अन् खासदार उदयनराजे भाेसले अचनाक संतापले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.