Sharad Pawar Jayant Patil esakal
सातारा

'या' सात मतदारसंघांत विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून मोठी फिल्डिंग; ढासळलेला बालेकिल्ला पुन्हा उभारण्याचा निर्धार!

सकाळ डिजिटल टीम

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी पक्षाच्या विभाजनानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह जिल्ह्यातून हद्दपार झाले आहे.

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. काही इच्छुकांनी स्वत:हून पक्षाकडे उमेदवारी मागणीची तयारी केली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविले होते. तब्बल २९ इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत. यामध्ये राखीव फलटण मतदारसंघातून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यापैकी कोणाला रिंगणात उतरविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेची निवडणुकीची (Vidhan Sabha Election) आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विद्यमान आमदारांनी आतापासूनच संपर्क मोहीम सुरू केली आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी पक्षाच्या विभाजनानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह जिल्ह्यातून हद्दपार झाले आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीत तरी पक्षाचे घड्याळ चिन्ह अस्तित्वात राहावे, यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरा गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ढासळलेला बालेकिल्ला पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

त्यासाठी त्यांना मिळालेल्या तुतारी चिन्हाच्या माध्यमातून जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वारे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी आठही विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांकडून पक्षाने अर्ज मागविले होते. दिलेल्या मुदतीत पक्षाकडे सर्व आठ मतदारसंघांतून एकूण २९ अर्ज आले आहेत. यामध्ये सर्वाधिक इच्छुक फलटण मतदारसंघातून आहेत. कोरेगाव व कऱ्हाड उत्तरमध्ये विद्यमान आमदार इच्छुक आहेत.

मतदारसंघनिहाय इच्छुकांची संख्या अशी आहे. सातारा-जावळी : दोन, कोरेगाव : एक, कऱ्हाड उत्तर : एक, वाई : सात, फलटण : १३, माण-खटाव : चार, पाटण : एक एकूण २९ जणांनी या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी अर्ज केला आहे. या अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांच्या अर्जावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे खासदार शरद पवारांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहेत. त्यापूर्वी या इच्छुकांच्या मुलाखती प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील घेतील. त्यानंतर कोणाच्या नावाला अंतिम पसंती द्यायची, याचा निर्णय श्री. पवार घेणार आहेत.

हे आहे प्रमुख इच्छुक...

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा लढण्यासाठी प्रमुख इच्छुकांची नावे अशी आहेत. सातारा-जावळी : दीपक पवार, शफीक शेख, कोरेगाव : आमदार शशिकांत शिंदे, कऱ्हाड उत्तर : आमदार बाळासाहेब पाटील, वाई : डॉ. नितीन सावंत, यशराज भोसले, रमेश धायगुडे, बंडू ढमाळ, कैलास जमदाडे, डॉ. अनिल बुवासाहेब जगताप, पाटण : सत्यजितसिंह पाटणकर, फलटण : अमोल आवळे, दिगंबर आगवणे, अभय वाघमारे, प्रा. डॉ. अनिल जगताप, डॉ. राजेंद्र काकडे, बुवासाहेब हुंबरे, रमेश आढाव, माण-खटाव : प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, अभय जगताप, अनिल देसाई.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

Latest Marathi News Updates : वडीगोद्री रोडवर मराठा ओबीसी आंदोलक समोरा समोर आल्याने गोंधळ

Sharad Pawar: श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ घेणार शरद पवारांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले अन्...! R Ashwin शतकी खेळीनंतर काय म्हणाला ते वाचा

SCROLL FOR NEXT