शिखर शिंगणापूर यात्रा  Sakal
सातारा

सातारा: कोरोनाचे निर्बंध पाळत होणार शिखर शिंगणापूर यात्रा

आमदार संजय जगताप यांची याबद्दल माहिती दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

खळद : दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखल्या जाणा-या श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील चैत्र यात्रा कोरोणाचे निर्बंध पाळून (सॅनिटायझर व मास्क चा वापर करून) व्हावी अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना दिल्या असल्याचे माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.

या यात्रेमध्ये कावड सोहळ्याला विशेष महत्त्व असून यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो भाविक कावडीसह पवित्र नद्यांचे जल घेऊन अवघड अशा मुंगी घाटाची चढन करून शंभू महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी जातात.यामध्ये पुरंदर तालुक्यातूनही अनेक कावडी जात असतात .यांना येथे मानाचे स्थान आहे.

मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोणाच्या पार्श्वभूमीवरती असणाऱ्या निर्बंधांमुळे ही कावड यात्रा बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता सर्वत्र कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावरती घटली आहे व या विषाणूची तीव्रताही कमी झाली आहे तरी या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या वर्षी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर शंभू महादेव यात्रेला व कावड सोहळ्याला परवानगी द्यावी अशी मागणी येथील भाविकांनी ठरावाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,पुरंदर -हवेलीचे आमदार संजय जगताप, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना केली होती.

"याबाबत आमदार संजय जगताप यांनी सोमवारी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कावड धारकांच्या मागणीचे निवेदन त्यांना देऊन यात्रेला परवानगी देण्याची विनंती केली असता पवार यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून कोरोनाचे निर्बंध पाळत (सॅनिटायझर व मास्क चा वापर करून) यात्रेला परवानगी देण्याची सांगितले.

पुरंदर मध्ये जल्लोष

शिखर शिंगणापूर यात्रा (कावड सोहळा) हे पुरंदर तालुक्यातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असून या कावड यात्रेला परवानगी मिळाल्याची माहिती समजताच संपूर्ण पुरंदर तालुक्यात सासवड, खळद, एखतपूर -मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी, शिवरी, बेलसर, पिसर्वे सह अनेक गावातील नागरिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत या निर्णयाचे स्वागत केले तर तरुणांनी मोठ्या प्रमाणावरती जल्लोष करीत सोशल मीडियातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT