म्हसवड : शहराच्या मध्यभागात लोकवस्तीत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील डॉक्टर मुलासह आणखी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहर व परिसरातील नागरिकांत मोठी खळबळ उडाली. दरम्यान, या एकाच कुटुंबातील एकूण सहा जण बाधित झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांचेही धाबे दणाणले आहेत.
शहरातील भरवस्तीतील एका 58 वर्षीय पुरुषाचा शनिवारी (ता.27) कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण शहर व परिसरातील रस्ते सील करण्यात आले होते. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सर्वांचे व त्याच्या सहवासात आलेल्या लोकांचेही घशातील स्त्राव घेण्यात आले होते. एकूण 17 जणांची तपासणी करण्यात आली होती. संपूर्ण कुटुंब राहत्या घरी क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यापैकी बाधिताच्या कुटंबातील दोन पुरुष, दोन महिला व एका अल्पवयीन मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित 12 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
येथील या एकाच कुटुंबातील बाधित रुग्णांमध्ये एक डॉक्टर असून, तेही पॉझिटिव्ह आल्याने त्या डॉक्टरांकडे उपचार घेतलेल्या रुग्णांची माहिती घेण्यात येत असून, डॉक्टरांच्या संपर्कात आलेले सर्व जण धास्तावले आहेत. सहा जण बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची साखळी मोठी असून, ती शोधणे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. पालिकेने शहर शनिवारपासूनच लॉकडाउन केले असून, अंतर्गत सर्व रस्ते सील केले आहेत. संबंधित कुटुंबाच्या निवासस्थानी व परिसरात पालिकेने जंतुनाशक फवारणी केली आहे.
दुष्काळी तरसवाडी आता पर्यटनाकडे!
पाचगणीतून पळालेल्या काेराेनाबाधित युवतीचा थांगपत्ता लागला पण...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.