satara esakal
सातारा

सातारा : जबरी चोऱ्या रोखणार कोण?

सातारा शहरात ठोस उपाययोजनांची गरज;

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शहरातील विविध रस्त्यांवर जबरी चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील काही संशयितांना शहर पोलिसांनी पकडले असले तरी, शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेच्या संरक्षणाची तसेच कुठेही वावरताना निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलिस दलावर येते. त्या अनुषंगाने पोलिस दल कार्यरत असते. परंतु, शहरात रात्रीच्या वेळी फिरायला किंवा कुठे लघुशंकेसाठी थांबायलाही भीती वाटावी, अशी काही ठिकाणी परिस्‍थिती निर्माण झाली आहे. त्यात प्रामुख्याने पोवई नाका ते मुख्य बस स्थानक व पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय रस्त्यांच्या समावेश होतो. सातारा शहर

हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

शहराची व्याप्तीही मोठी आहे. त्यामुळे येथील मुख्य बस स्थानकावर रात्री-अपरात्री येणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. तालुका व जिल्ह्याच्या इतर भागात जाणाऱ्या नागरिकांनाही रात्रीच्या वेळी आधी साताऱ्यातच यावे लागते. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांकडे येणाऱ्या लोकांची वर्दळही रात्रीच्या वेळी होत असते. त्यामुळे हे रस्ते सुरक्षित ठेवण्याची पोलिसांची जबाबदारी आहे.

या रस्त्यांवरील घटनांबरोबरच गेल्या आठवड्यात दिवसा व सायंकाळच्या वेळेतही महिलांची पर्स हिसकावणे, पायी जाणाऱ्यांचे मोबाईल चोरण्याचे प्रकारही दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी केल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरून चालायचे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनांच्या पार्श्वमीवर जबरी चोऱ्या करणाऱ्या काहींना शहर पोलिसांनी अटक केली, ही समाधानकारक बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT