कऱ्हाड : टोलनाक्यावरील ‘फास्टॅग’ने (Fasttag) तासवड्यातील टोल चुकवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाला (National Highway) पर्याय शहरी व ग्रामीण भागातून जाणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहनांची वर्दळ घटली आहे. ‘फास्टॅग’ने त्या अवजड वाहनांना लगाम लागल्याने शहरीसह ग्रामीण भागातील नागरी वस्तीला दिलासा मिळाला आहे. रस्त्यांचा दर्जाही चांगला राहण्यास हातभार लागणार आहे.
शहरीसह ग्रामीण भागातील तब्बल २० किलोमीटरच्या मार्गावरून जाणारी अवजड वाहने त्या भागातील स्थानिकांसाठी मृत्यूचा सापळा बनली होती. अवजड वाहने जाणारा गजबजलेला व नागरी वस्तीचा भाग होता. त्यामुळे अवजड वाहनांची वर्दळ स्थानिकांच्या जीवावर बेतत होती. त्यात छोटे-मोठे अपघात होऊन किमान ६० जणांना जीव गमवावा लागला होता. अवजड वाहनांकडून होणारी टोल चुकवेगिरी अपघाताला निमंत्रण ठरत होती.
कारण नसताना त्यात लोकांना जीव गमावावा लागत होता. त्यामुळे नागरी वस्तीतून येणारी अवजड वाहने स्थानिक लोकांचे जीव गमावणारी व त्यांना कायमस्वरूपाचे अपंगत्व देणारी ठरली होती. दररोज होणाऱ्या वर्दळीने ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. वाहने जावून त्या रस्त्यांची चाळण झाल्याने पर्यायाने त्या सगळ्याचा खर्च बांधकाम विभागालाही डोईजड ठरत होता. साताराहून कऱ्हाडला राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या सगळ्याच वाहनांना तासवडे येथे अवजड वाहनांना किमान २५० रुपयांचा टोल आहे.
तो चुकविण्यासाठी ही अवजड वाहने महामार्गाला पर्यायी मार्ग असलेला उंब्रजहून शिवडे फाट्यावरून मसूरकडे, तेथून कोपर्डे हवेलीमार्गे कऱ्हाड शहरातून कोल्हापूर नाक्याकडे जाणारा मार्ग वाहनधारकांकडून वापरला जात होता. अवजड वाहने टोल चुकवण्यासाठी तो फंडा वापरत होते. मात्र, त्याच फंड्याला फास्टॅगने मात्र लगाम लावला आहे. फास्टॅगमुळे पर्यायी मार्गावरील वाहतूक जवळपास बंद झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरी वस्तीने मोकळा श्वास घेतल्याचेच दिसते.
अवजड वाहनामुंळे या भागाने घेतला मोकळा श्वास
- कोल्हापूर नाका
- दत्त चौक
- कृष्णा कॅनॉल
- विद्यानगर
- बनवडी फाटा
- कोपर्डे हवेली
- यशवंतनगर
- शिरवडे फाटा
- मसूर
- कोरेगाव फाटा
- शिवडे फाटा
अपघातही घटले...
अवजड वाहनांमुळे कोल्हापूर नाक्यासह दत्त चौक व कृष्णा कॅनॉल चौक व ग्रामीण भागात वर्षभरात पन्नास अपघात झाले होते. त्या अपघातांतही घट झाल्याची नोंद आहे. यापूर्वी अवजड वाहनांनी ठोकरल्याने किमान ५० लोकांना जीव गमवावा लागला होता. अपघातग्रस्त किमान २० मोठी वाहने पोलिसांनी जप्तही केली होती. अन्य वाहने अज्ञात होती. पहाटे, रात्री उशिरा अपघातानंतर न थांबताच वाहने तेथून निघून जात होती. त्याचेही प्रमाण आता नगण्य झाल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.