लोणंद (जि.सातारा) : कोरोना विषाणू संसर्गच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी खंडाळा तालुक्यातील पारंपरिक 'बोरीचा बार ' न भरवीण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.24) बोरी व सुखेड या दोन्ही गावातील प्रमुख व पोलिस प्रशासनाच्या झालेल्या एकत्रीत बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही गावातील महिलांना ओढयाकाठी एकत्र येवून हातवारे करत एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहाण्याचा ज्याला 'बोरीचा बार ' साजरा करणे याचा आनंद घेता येणार नाही. कोरोनाने बोरीच्या बारावरही फणा काढल्याची भावना येथे व्यक्त केली जात आहे.
...अन्यथा श्री शंभू महादेवाचे दर्शन पडेल हजार रुपयांना
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बोरी व सुखेड या दोन्ही गावातील महिला सजून धजून या दोन्ही गावच्या मधून वाहाणाऱ्या ओढयाकाठी सनई, तुतारी, डफ आदी वाद्याच्या गजरात एकत्र येतात. त्यानंतर एकमेकींना हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहाण्याची पारंपारिक प्रथा जाेपासली जाते. शिव्या देण्याची प्रथा का सुरु झाली आणि केव्हा झाली याबाबत दोन्ही गावातील कोणालाच आजही नेमकेपणाने सांगता येत नाही. परंतु गेल्या अनेक वर्षापासून अखंडितपणे ही प्रथा येथे सुरु आहे.
...इथं चित्र बघून साकारतात गणेशमूर्ती
ही प्रथा बंद होण्याबाबत आजवर पोलिस यंत्रणा व महसूल प्रशासन तसेच अंधश्रद्धा निर्मलून समिती आदी वेगवेगळया स्तरांवरुन प्रयत्न झाले. मात्र त्यामध्ये खंड पडला नाही. दाेन्ही गावातील गावकरी विशेषतः महिला याबाबत ठाम असतात. जेष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्यासह अन्य विचारवंतानी येथे येवून याबाबत जागृती केली आहे. परंतु त्याचा 'बोरीचा बार ' हा आजपर्यंत भरविला गेला आहे. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी या दोन्ही गावातील महिलांनी एकत्र येवून महिलांचे पारंपारीक खेळ खेळतात. त्यानंतर 'बोरीच्या बार 'ची यास प्रारंभ हाेताे. या प्रथेत कोणत्याही अनिष्ठ बाबी नसल्याचे या दोन्ही गावातील महिला व नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम गेली अनेक वर्षे पोलिस बंदोबस्तात भरविला जाताे.
पाच दशकांपासून 'हा' सुवासिक तांदूळ पिकताेय महाराष्ट्रातील 'या' गावात
दरम्यान यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष चौधरी यांनी या दोन्ही गावातील प्रमुखांची बोरी येथे सोशल डिस्टन्सिंग राखत एकत्रीत बैठक घेवून यावर्षी 'बोरीचा बार ' साजरा न करण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या आवहानास दाेन्ही गावाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावर्षी 'बोरीचा बार ' न भरवीण्याचा त्वरीत एकमताने निर्णय घेतला. यावेळी बोरी गावच्या सरपंच मयुरी सचिन धायगुडे, ग्रामसेवक संदीप कळसाईत, गावकामगार तलाठी श्री.जाधव तसेच बोरी गावातील प्रतिष्ठित नागरिक व पोलीस पाटील श्री.पिसाळ, सुखेड गावच्या सरपंच नलिनी वाघमारे, ग्रामसेविका भारती कचरे, पोलिस पाटील धायगुडे व सुखेड गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच लोणंद पोलिस ठाण्यातील बीट अमंलदार अविनाश नलवडे, गोपनीय विभागाचे हवालदार फैय्याज शेख उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
यूपीएससी रँकर स्नेहल धायगुडे काय म्हणते वाचा
त्या 'क्वारंटाइन' वाल्यांच्या कथेविषयी प्रशासन म्हणाले...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.